सध्या सुपरस्टार सूर्या (Suriya Sivakumar) आणि प्रकाश राज (Prakash Raj) यांनी अभिनीत केलेला जय भीम (Jai Bhim) चित्रपटाची खूप चर्चा सुरु आहे. एकीकडे सिनेमाचं मोठ्या प्रमाणात कौतुक सुरु असताना दुसरीकडे सिनेमातील एका सीनवरुन वाद देखील सुरु झाला आहे. प्रकाश राज (Prakash Raj) यांच्यावर चित्रित केलेला हा सीन आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या चित्रपटातील सीनवर आक्षेप घेतला जात असून तो हटवण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.
Prakash Raj with his propaganda in the movie ‘Jay Bhim’ where he slaps a person who speaks in Hindi. pic.twitter.com/1SwPVssbK7
— Amit Kumar (@AMIT_GUJJU) November 2, 2021
या सीनमध्ये एक वयस्कर माणूस हिंदीमध्ये बोलत आहे. त्यावर प्रकाश राज यांचं पात्र हिंदी ऐकूण भडकतं आणि त्या वयस्क व्यक्तीला कानाखाली लगावतो असा तो सीन आहे. कानाखाली लावताना त्या व्यक्तिला उद्देशून फक्त तमिळमध्ये बोला असंही सुनावतो. यावरुन काही यूजर्सनी आक्षेप घेतला आहे. प्रकाश राज यांचं पात्र हिंदी भाषेचा तिरस्कार करत असल्याचं या सीनमध्ये दाखवलं आहे. हा सीन चित्रपटातून वगळण्याची मागणी केली जात आहे. हा सीन चित्रपटात टाकण्याची काहीही गरज नाही, असं काही यूजर्सचं म्हणणं आहे. (हे ही वाचा Kurup Official Trailer: 'कुरुप' सिनेमाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित.)
Slaps a man for speaking Hindi ?!
What culture is this man portraying in the movie ?!
We speak 22 different languages with English & Hindi as official languages .
Are we going to slap each other over language?
Shollunge !! https://t.co/lVkn1b3NZN
— Capt Harish Pillay (@captpillay) November 2, 2021
As #Perumalsamy @prakashraaj you were too good, very restrained and convincing! 👍 https://t.co/lFpf9DVFk7 pic.twitter.com/sOKgWWsn3q
— Sreedhar Pillai (@sri50) November 2, 2021
#JaiBhim … I’m immensely proud to be a part of this honest film .. 🙏🏻@Suriya_offl #Jyotika for believing in this film @tjgnan #kruthika really proud of you both 👍👍@rajsekarpandian @RSeanRoldan @srkathiir @KKadhirr_artdir @philoedit @rajisha_vijayan #Manikandan @jose_lijomol pic.twitter.com/IfEzqMUNBi
— Prakash Raj (@prakashraaj) November 2, 2021
सत्य घटनेवर सिनेमा
हा सिनेमा फक्त सिनेमा नसुन न्यायाच्या विरुद्धचा लढा दाखवणारा आहे. जय भीम चित्रपट एक कोर्ट रूम ड्रामा असून अभिनेता सुपरस्टार सूर्या यात एका वकिलाच्या भूमिकेत दिसला आहे. हिंदी आणि दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. सिनेमाचे दिग्दर्शन लेखक-पत्रकार असलेले टी.जे.नानवेल(T.J.Gnanavel) यांचे आहे तसेच चित्रपटाचे निर्माण अभिनेता सुरीयाने पत्नी ज्योतिका (Jyotika)सोबत केले आहे.