'कुरुप' (Kurup) या हिंदी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. दिवाळीत धमाका केल्याने चाहत्यांमध्येदेखील सिनेमाबाबत उत्सुकता दिसून येत आहे. 'कुरुप' सिनेमाचा अधिकृत ट्रेलर गुरुवारी यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा 12 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कुरुप' सिनेमा सत्यघटनेवर आधारित सिनेमा आहे. केरळमधील सुकुमार कुरुप नावाच्या व्यक्तीवर सिनेमा भाष्य करतो. सिनेमाच्या मख्य भुमिकेत Dulquer Salmaan आहे.
Kurup, India’s longest hunted fugitive. Deranged mastermind? Accidental conman? Find out on 12th November in cinemas worldwide.https://t.co/DB7hsmLYUG@dulquer #SobhitaDhulipala @srinatkp @Indrajith_s #ShineTomChacko@sunnywayn@kurupmovie@dqswayfarerfilm#KurupFromNov12 pic.twitter.com/wmdjZ530Ez
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) November 3, 2021
'कुरुप' सिनेमात प्रेक्षकांना रोमांच, उत्कंठावर्धक आशय आणि नाट्य पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षका आता सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. सिनेमात पोलिस आणि गुन्हेगाराची अॅक्शन पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा जगभरातील सिनेमागृहांत प्रदर्शित करण्यात येणार आहे. (हे ही वाचा Vijay Sethupati Attacked: साउथ अभिनेता 'विजय सेतुपतीवर' बंगळुरू विमानतळावर हल्ला.)
सिनेमात शोभिता धुलीपाला, इंद्रजीत सुकुमारन, शिने टॉम चैको, सन्नी वायने आणि भारत निवास हे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग मुंबई, केरळ, दुबई, बंगळुरू, म्हैसूर आणि अहमदाबादमध्ये झाले होते. या चित्रपटाला सुशिन श्याम यांनी संगीत दिले आहे.