Isha Koppikar-Timmy Narang Divorce: अभिनेत्री ईशा कोप्पिकर 14 वर्षांच्या संसारानंतर पतीपासून झाली विभक्त
बॉलिवूड अभिनेत्री इशा कोप्पीकर | Facebook

बॉलिवूड अभिनेत्री इशा कोप्पीकर (Isha Koppikar) आणि Timmy Narang हे दोघं विभक्त झाल्याची माहिती समोर येत आहे. ईशा तिच्या 9 वर्षीची लेक Rianna ला घेऊन पतीपासून वेगळी झाली आहे. तिनं Timmy चं घर सोडल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत.

Times Of India च्या रिपोर्ट्सनुसार, मागील महिन्यातच त्यांचा घटस्फोट निश्चित झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना एकमेकांशी जुळवून घेताना त्रास होत होता. अशा परिस्थितीमध्येही त्यांनी 'लग्न' वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. आता अभिनेत्री ईशा मुलीला घेऊन घराबाहेर पडली आहे. त्या दोघी स्वतंत्र राहतात. पोर्टलकडून ईशासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न झाला मात्र अभिनेत्रीने आता याबद्दल बोलणं खूप घाईचं होईल आणि तिला 'प्रायव्हसी' हवी असल्याचंही ती म्हणाली आहे. तिचा पती देखील यावर काहीही बोललेला नाही.

ईशा आणि टिम्मी जिम मध्ये भेटले आणि प्रेमात पडले. डेटिंगपूर्वी ते 3 वर्ष एकमेकांचे मित्र राहिले. नोव्हेंबर 2009 मध्ये त्यांनी लग्न केले होते. 14 वर्षांच्या संसारानंतर आता ते वेगळे होत आहेत. Sania Mirza-Shoaib Malik Divorce: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला? पाकिस्तानी क्रिकेटरने केली फसवणूक- Reports .

बॉलिवूड मध्ये ईशाने 'डॉन','क्रिश्ना कॉटेज','क्या कुल है हम','एलओसी कारगिल' मध्ये काम केले आहे. सोबतच ती मराठी आणि तेलगू मध्येही काम करत होती. 2019 मध्ये ईशाने भाजपा मध्येही प्रवेश केला आहे. भाजपा मध्ये ती women transport wing ची जबाबदारी सांभाळते.