Housefull 5

Housefull 5: हाऊसफुल या चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. दरम्यान, हाऊसफुल 5 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून  साजिद नाडियाडवाला ची सुपरहिट कॉमेडी फ्रँचायझी 'हाऊसफुल 5' 6 जून 2025 रोजी येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी या चित्रपटात 18 मोठे स्टार्स दिसणार आहेत.  तरुण मनसुखानी दिग्दर्शित 'हाऊसफुल ५'चा  ट्रेलर ईदला प्रदर्शित होणाऱ्या सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटासोबत येणार आहे. सध्या ट्रेंड आला आहे  कि, एखाद्या चित्रपटात येणाऱ्या दुसऱ्या चित्रपटाची मार्केटिंग केली जाते किंवा येणाऱ्या चित्रपटाचा काही भाग दाखवला जातो. दरम्यान, हाऊसफुल ५ आणि  सिकंदरचा ट्रेलर अशाच पद्धतीने शूट करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंटसाठीही हे वर्ष खूप खास आहे कारण त्यांचा 75 वा वर्धापनदिन आहे. चाहते आता 6 जून 2025 ची आतुरतेने वाट पाहत आहेत, जेव्हा 'हाऊसफुल 5' आपल्या जबरदस्त कॉमेडीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहे. हेही वाचा: Urmila Kothare Car Accident Case: कार अपघात प्रकरणी उर्मिला कोठारे ची Bombay High Court मध्ये धाव; तपास Mumbai Police Crime Branch कडे देण्याची मागणी

'हाऊसफुल ५'मध्ये अनेक बडे कलाकार दिसणार आहेत. यात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, चित्रांगदा सिंग, रणजित, सौंदर्या शर्मा, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ,  आणि निकितिन धीर यांसारखे बडे कलाकार दिसणार आहेत.

'हाऊसफुल 5' 6 जून 2025 रोजी रिलीज होणार 

 

View this post on Instagram

 

A post shared by Movified (@movifiedbollywood)

नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंटसाठी हे वर्ष ब्लॉकबस्टर ठरणार आहे कारण त्यांच्या  ग्रँडसन एंटरटेन्मेंटला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान, नाडियाडवालाच्या यांच्या हाऊसफुल च्या प्रत्येक भागाला चांगले प्रेम मिळाले आहे. आता  हाऊसफुल 5 प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 'सिकंदर'नंतर टायगर श्रॉफचा 'बागी ४' प्रदर्शित होणार असून त्यानंतर विशाल भारद्वाज दिग्दर्शित शाहिद कपूरअभिनीत एक अनाम चित्रपट प्रदर्शित होणार आहे.