Urmila Kothare | Instagram

डिसेंबर 2024 मध्ये उर्मिला कोठारेचा (Urmila Kothare) कांदिवली भागामध्ये एक भीषण अपघात झाला होता. पोईसर मेट्रो स्टेशन जवळ उर्मिलाच्या गाडीचा धडकेत एका मजूराचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिस तपास समता नगर पोलिस स्टेशन कडून मुंबई पोलिस क्राईम ब्रांच (Mumbai Police Crime Branch) कडे देण्याची मागणी उर्मिलाने केली आहे. तिने तपासात पक्षपात होत असल्याचा आरोप केला आहे तसेच दावा केला आहे की सीसीटीव्ही फुटेजसह महत्त्वपूर्ण पुरावे वारंवार विनंती करूनही तिला दिलेले नाहीत.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने बुधवारी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि पोलिसांना अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनाचा यांत्रिक तपासणी अहवाल प्रिझर्व्ह करण्याचे निर्देश दिले आहेत.

28 डिसेंबर 2024 च्या रात्री उर्मिलाचा चालक गजानन पाल हा गाडी चालवत होता. त्याचा गाडीवरचा कंट्रोल गेला आणि गाडी पुढे धडकली. ह्यंडाई कंपनीची ही कार होती. त्याच्या धडकेत मेट्रो चे दोन कर्मचारी जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी उर्मिलाच्या चालकाला अटक झाली आणि नंतर जामीनावर सुटका झाली आहे.

वकील Amarendra Mishra यांच्यकडून उर्मिलाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मेट्रोचे बांधकाम करणाऱ्या Skill Infrabuild LLP, या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा दावा उर्मिला कोठारे ने केला आहे. त्या ठिकाणी ‘caution’ किंवा ‘work in progress’ असे फलक लावण्यात आलेले नव्हते आणि जेसीबीसह अवजड यंत्रसामग्री योग्य इशारे न देता रस्त्यावर उभी असल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच योग्य कागदपत्रांशिवाय मशिनरी नंतर काढून टाकण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

निःपक्षपाती तपास व्हावा यासाठी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, अशी विनंती उर्मिला कोठारेने न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी 17 मार्च रोजी ठेवली आहे.