
फोर्ब्स मासिकाने नुकतीच जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सेलिब्रिटी (Forbes’ Highest Paid Celebrities) लोकांची यादी जाहीर केली आहे. 10० लोकांना स्थान मिळालेल्या या यादीमध्ये टेलर स्विफ्ट (Taylor Swift) या पॉप गायिकेने पहिले स्थान प्राप्त केले आहे. टेलर स्विफ्टने मागच्या वर्षी तब्बल 18.5 कोटी डॉलरची कमाई केली आहे. याआधी हा विक्रम रियालिटी टीव्ही स्टार कायली जेनर (Kylie Jenner) हिच्या नावे होता. आता या यादीत कायली दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय कलाकारांपैकी अक्षय कुमार हे 'फोर्ब्स'च्या जगातील सर्वाधित कमाई करणाऱ्या यादीतील एकमेव नाव आहे.
स्विफ्ट ने 2018 मध्ये आपल्या रेप्युटेशन स्टेडियम दौऱ्यासह, नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग आणि रिपब्लिक रेकॉर्डसच्या नवीन व्यवहाराद्वारे भरपूर कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वी टेलर स्विफ्ट आपल्या सहा अॅल्बमांच्या अधिकारांबद्दल चर्चेत आली होती. अवघ्या 15 व्या वर्षी स्विफ्टने आपल्या करियरची सुरुवात केली होती, आज 29 वर्षी ती जगातील सर्वाधिक कमाई करणारी सेलिब्रिटी बनली आहे. या यादीतील इतर महिला सेलिब्रिटीजमध्ये कॉमेडियन एलेन डीजेनरस, रिऍलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियां वेस्ट, गायिका रिहाना, केटी पेरी आणि पिंक यांचा समावेश आहे. (हेही वाचा: YouTube च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 8 वर्षांचा मुलगा अव्वल; व्हिडीओज बनवून कमावले तब्बल 155 कोटी)
दरम्यान, अक्षय कुमारला या लिस्ट मध्ये 33 वे स्थान प्राप्त झाले आहे. त्याने गेल्या वर्षी 65 मिलियन डॉलर इतकी कमाई केली होती. अक्षय कुमार ने जॅकी चेन, ब्रॅडली कुपर यांनादेखील मागे टाकले आहे. सध्या अक्षय कुमार 'मिशन मंगल' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू हे कलाकार आहेत. शिवाय अक्षय कुमार हाउसफुल 4, गुड न्यूज आणि सूर्यवंशी च्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे.