बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) हॉलिवूड स्टार निक जोनास (Nick Jonas) याच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर अनेक काळ चित्रपटांपासून दूर राहिली. आपल्या पतीसह ती तिचे वैवाहिक आयुष्य छान एन्जॉय करताना दिसली. मात्र दीर्घ काळाच्या सुट्टीनंतर ती आता पुन्हा चित्रपटांमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने अनेक प्रोजेक्ट्स साईन केले असून ते लवकरात लवकर तिला पूर्ण करायचे आहेत. तिला नेटफ्लिक्स दोन चित्रपट 'वी कैन बी हीरोज' आणि 'दी वाइट टाइगर' अशा दोन चित्रपटांसाठी कास्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर ती 'मॅट्रिक्स 4' या चित्रपटाचे शूटिंग देखील करत आहे. त्याचबरोबर ती रूसो ब्रदर्सच्या सीरिज सिटाडेल मध्ये रिचर्ड मद्देनसह दिसेल. याचबरोबर तिने आता इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तिला जिम स्ट्राउस, सॅम ह्यूगन आणि सेलीन डियोनसह एक रोमांटिक चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले आहे.
प्रियंकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. डेडलाइने दिलेल्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे नाव 'टेक्स्ट फॉर यू' असे ठेवण्यात आले आहे. प्रियंकाने या पोस्ट खाली लिहिले आहे की, 'या अतुलनीय लोकांसोबत काम करण्यास मी खूपच उत्साहित आहे. यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे' असेही तिने सांगितले आहे. हेदेखील वाचा- Priyanka Chopra चे पुस्तक 'Unfinished' ठरले अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट Best Seller, अभिनेत्री सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आनंद
रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, हा चित्रपट 2016 चा जर्मन चित्रपट 'SMS Fur Dich' शी प्रेरित आहे. हा सोफी क्रेमरच्या पुस्तकावर आधारित होता. या चित्रपटाशिवाय प्रियंका चोपड़ा मिंडी कलिंगसह एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. ज्याचे नाव आहे बिग फॅट इंडियन वेडिंग. याचे दिग्दर्शन मिंडी ने केले आहे.
या चित्रपटांसह प्रियंकाने लॉकडाऊन दरम्यान अॅमेजॉन व्हिडिओच्या भयपटात 'वेलकम टू द बल्महाऊस' प्रदर्शित केली होती.