'मी कधीच Bra घालणार नाही, माझे स्तन बेंबीपर्यंत पोहोचले तरी चालतील'; लोकप्रिय अभिनेत्रीने मांडले आपले विचार (Watch Video)
Representational Image (Photo Credits: unsplash.com)

‘अंतर्वस्त्रे (Undergarments) ही फार खाजगी बाब आहे, त्याबाबत चारचौघात बोलू नये,’ असेच आपल्याला आतापर्यंत सांगण्यात आले होते. मात्र सध्या काळ बदलत आहे, स्त्री-पुरुष अंतर्वस्त्रांबाबत आपल्याला काय वाटत याबाबतचे आपले विचार मुक्तपणे मांडत आहेत. नुकतेच अभिनेत्री हेमांगी कवी हिने, ‘ब्रा’ (Bra) बाबत एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. त्यात ती म्हणते-‘किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहते, त्यांची इच्छा नसतानाही 'लोग क्या कहेंगे' साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात,’ आता हॉलिवूड अभिनेत्री गिलियन अँडरसन (Gillian Anderson) हिनेही आपण अंतर्वस्त्र घालणार नसल्याचे सांगितले आहे.

गिलियन अँडरसनने सोशल मिडियावर खुलासा केला आहे की तिने ब्रा घालणे बंद केले आहे आणि आता इथून पुढेही ती कधी ब्रा घालणार नाही. सोमवारी इन्स्टाग्रामवर आपल्या 1.8 लाख फॉलोअर्ससोबत प्रश्न-उत्तराच्या कार्यक्रमामध्ये बोलताना ‘द क्राउन’ स्टारने सांगितले की, ‘ब्रा’बाबत ती आळशी झाली आहे. यावेळी ती म्हणाली की, ‘मी आता ब्रा घालत नाही व इथून पुढेही घालू शकणार नाही. हे मी करू शकणार नाही, मला माफ करा... भले मग माझे स्तन बेंबीपर्यंत पोहोचले तरी चालतील पण मी ब्रा कधीच घालणार नाही. हे खूपच अनकम्फर्टेबल आहे.'

गिलियनचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या मोकळेपणाने तिने आपले विचार मांडले आहेत, त्याबाबत तिचे कौतुक होत आहे. अँडरसनच्या या व्हिडीओला 124,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओखाली अनेक महिलांनी कमेंट्स करून आपणही ब्रा घालणे बंद केले असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा: 365 Days अभिनेता Michele Morrone लवकरच करू शकतो बॉलिवूडमध्ये डेब्यू; Karan Johar ने संपर्क साधल्याची चर्चा)

दरम्यान, गिलियन अँडरसन एक 52 वर्षीय ब्रिटीश-अमेरिकन अभिनेत्री आहे. 'द हाउस ऑफ मिर्थ', 'द मायटी', 'द लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड', 'द एक्स फाइल्स' आणि 'द एक्स फाइल्स: आय वॉण्ट टू बिलिव्ह', 'द क्राउन', 'सेक्स एज्युकेशन' सारख्या लोकप्रिय प्रकल्पांमध्ये काम केले आहे.