ग्रॅमी अवॉर्ड्स । PC: (Photo Credits: Instagram)

ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant)  मुळे जगभरात पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. बॉलिवूड मध्येही सिनेमा रिलीज च्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच आता अमेरिकेच्या लॉस एंजलिस मध्ये होणारे प्रतिष्ठित ग्रॅमी अवॉर्ड्स (Grammy Awards ) देखील लांबणीवर पडले आहेत. नुकतेच या अवॉर्डस च्या आयोजकांनी त्याबददल माहिती दिली आहे.

यंदा  64 वा ग्रॅमी अवॉर्ड्स 31 जानेवारी दिवशी होणार होता. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट देखील सीबीएस नेटावर्क वर दाखवलं जाणार होते मात्र आता हे अवॉर्ड्स ओमिक्रॉन आणि वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे लांबणीवर पडले आहेत. 2021 च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये या अवॉर्ड्सचे नॉमिनेशन जाहीर करण्यात आले होते.

2021 मध्येही ग्रॅमी अवॉर्ड्स कोविड 19 च्या कारणामुळे पोस्टपोर्न करण्यात आली आहे. यामुळे या सोहळा जानेवारी ऐवजी मार्च महिन्यात घेतला होता. सोशल डिस्ट्न्सिंग चे नियम पाळत तो पार पडला होता. हे देखिल नक्की वाचा: Omicron Scare: अमेरिकेमध्ये वाढते कोरोना रूग्ण पाहता 12-15 वयोगटातील मुलांनाही Pfizer Vaccine Booster Shot देण्यास US CDC ची शिफारस .

सीबीएस आणि रेकॉर्डिंग अ‍ॅकॅडमीने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक हेल्थ विशेषज्ञांसोबत चर्चा केली केली त्यानंतर हा अवॉर्ड शो पुढे ढकलला आहे. याचप्रमाणे मनोरंजन जगतामधील काही अवॉर्ड्स शो पुढे ढकलण्यात आले आहेत.

ग्रॅमी अवॉर्ड्स  हा  सर्वात मोठा वार्षिक संगीत पुरस्कार सोहळा आहे. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे  आयोजन केले जाते. यामध्ये संगीत क्षेत्रात काम करणार्‍या  नामवंत कलाकारांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे सन्मानित केले जाते.  नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्‌स ॲन्ड सायन्स ह्या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्याची पद्धत आहे.