Gina Lollobrigida Passes Away: 'जगातील सर्वात सुंदर स्त्री' जीना लोलोब्रिगिडा हिचे निधन
Gina Lollobrigida | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

'जगातील सर्वात सुंदर स्त्री' (Most Beautiful Woman In The World) असा नावलौकीक कमावलेली आणि हॉलिवूडच्या सुवर्ण युगातील (Golden Age of Hollywood) शेवटचे प्रतिक मानली गेलेली अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा ( Gina Lollobrigida) हिचे निधन झले आहे. ती 95 वर्षाची होती. इटालियन कृषी मंत्री फ्रान्सिस्को लोलोब्रिगिडा (Francesco Lollobrigida) यांनी तिच्या मृत्यूची बातमी ट्विट केली. ट्विटरवरुन जीना लोलोब्रिगिडा हिच्या मृत्यूची (Gina Lollobrigida Passes Away) बातमी देताना त्यांनी 'इटालियन सिनेमॅटोग्राफी आणि संस्कृतीतील सर्वात तेजस्वी तारेपैकी एक' अशा शब्दात तिचा उल्लेख केला.

फ्रान्सिस्को लोलोब्रिगिडा यांनी ट्विटरवरुन माहितीदेताना सांगितले की, आज जीना लोलोब्रिगिडा आपल्यातून निघून गेली आहे. इटालियन सिनेमॅटोग्राफी आणि संस्कृतीतील एक तेजस्वी तारा, अतुलनीय चॅम्पियन, सौंदर्य आणि अष्टपैलुत्वाचे प्रतीक, विलक्षण स्त्री आणि व्यावसायिक आपल्यातून गेली. मात्री ती आपल्या कामातून नेहमीच आपल्यात राहील आणि प्रेरणा देत राहील. (हेही वाचा, Robbie Coltrane Passes Away: 'हॅरी पॉटर' चित्रपटात 'हॅग्रिड'ची भूमिका साकारणारे रॉबी कोल्ट्रेन यांचे निधन)

दरम्यान, इटलीचे संस्कृती मंत्री गेनारो संगियुलियानो (Gennaro Sangiuliano) यांनीही जीना लोलोब्रिगिडा हिच्या निधनाची बातमी ट्विटरद्वारे दिली. इटलीच्या ANSA वृत्तसंस्थेच्या वृत्ताचा दाखला देत सांग्युलियानो यांनी ट्विटरवर लोलोब्रिगिडा विषयी लिहिले, "रुपेरी पडद्यावरील दीप, अर्ध्या शतकाहून अधिक इटालियन चित्रपट इतिहासातील नायक. तिची मोहिनी चिरंतन राहील."

ट्विट

जीना लोलोब्रिगिडा अल्पवरीचय

जीना लोलोब्रिगिडा हचा जन्म रोमच्या पूर्वेकडील पर्वतीय भाग असलेल्या सुबियाको येथे 1927 मध्ये झाला. ती एका फर्निचर निर्मात्याची मुलगी होती. 1950 आणि 60 च्या दशकात, ती जगातील सर्वात उत्कष्ट कलाकारांपैकी एक होती. हॉलीवूडच्या सुवर्णकाळात तिने त्या काळातील अनेक आघाडीच्या पुरुष अभिनेत्यांना अनेक युरोपियन आणि अमेरिकन चित्रपटांमधून टक्कर दिली. जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणूनही तिला नावाजले गेले.