Game of Thrones Season 8 in India: 'गेम ऑफ थ्रॉन्स'चा सीझन 8 ऑनलाईन आणि टेलिव्हिजनवर कसा आणि कुठे पहाल?
Game of Thrones season 8 Teaser. (Photo Credits: YouTube)

GOT Season 8 on TV and Online Schedule in India: 'गेम ऑफ थ्रोन्स'(Game of Thrones) या जगप्रसिद्ध अमेरिकन सीरीजच्या आठव्या सीझनची जगभरात लोकांना प्रतिक्षा होती. अखेर 15 एप्रिलच्या सकाळी हॉटस्टारवर आणि आज (16 एप्रिल) पासून टेलिव्हिजनवर या सीरीजचा आनंद घेता येणार आहे. जगभरातील तरूणाईमध्ये 'गेम ऑफ थ्रॉन्स'ची क्रेझ आहे. ऑनलाईन आणि सोशल मीडियामध्ये 'गेम ऑफ थ्रॉन्स' सीझन आठची खूप चर्चा रंगत आहे. त्यामुळे उत्सुकतेपोटी तुम्हांलाही नेमकी ही सीरीज कुठे आणि कधी पहायची? हा प्रश्न पडला असेल तर पहा 'गेम ऑफ थ्रोन्स सीझन 8' टीव्ही (TV) आणि ऑनलाईन(Online)  माध्यमातून कधी,केव्हा पाहू शकता ते नक्की जाणून घ्या. Game of Thrones Season 8 Memes: 'गेम ऑफ थ्रोन्स' सीझन 8 च्या पहिल्या एपिसोड नंतर सोशल मीडियामध्ये मिम्स व्हायरल

गेम ऑफ थ्रोन्स सीझन 8 कुठे पहाल?

  • हॉटस्टार

भारतामध्ये 'गेम ऑफ थ्रोन्स' पाहण्याचा लोकाप्रिय पर्याय म्हणजे 'हॉटस्टार'. हॉटस्टार जागतिक स्तरावर एकावेळी ही सीरीज पाहता येणार आहे. त्यामुळे लेटेस्ट एपिसोड झटपट पाहता येणार आहेत. त्यामुळे स्मार्टफोन, टॅबलेट आणि स्मार्ट टीव्हीवर, लॅपटॉप सोबतच गेम ऑफ थ्रोन्स पाहता येईल.

खर्च किती?

हॉटस्टारवर 'गेम ऑफ थ्रोन्स' सीरीजचा कोणताच एपिसोड मोफत पाहता येत नाही. तुम्हांला दरमहा 299 रूपये किंवा प्रतिवर्षी 999 रूपयांचं सबस्क्रिप्शन घेऊन ही सीरीज पाहता येणार आहे. यामध्ये इतर आंतरराष्ट्रीय सीरीज देखील पाहता येणार आहेत. हॉटस्टारवर 365 रूपयांचं एक व्हीआयपी सबस्क्रिप्शनदेखील उपलब्ध आहे मात्र त्यावर तुम्हांला 'गेम ऑफ थ्रोन्स' पाहता येणार नाही.

भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता एपिसोड लाईव्ह केला जातो.

  • एचबीओ

'गेम ऑफ थ्रोन्स' ही सीरीज टेलिव्हिजनवरदेखील पाहता येणार आहे. भारतामध्ये HBO चॅनलवर ही सीरीज पाहता येईल.

खर्च

TRAI च्या नव्या दरपत्रकानुसार तुम्हांला HBO चॅनल प्रतिमहिना 11.80 रूपये, एच डी सेट अप बॉक्स असल्यास HBO HD 17.70 प्रति महिना अशा दरात उपलब्ध होईल. हे फक्त चॅनलचा दर आहे. त्यावर टॅक्स आणि इतर खर्च देखील आकारला जातो.

  • स्टार वर्ल्ड

Star World, Star World HD and Star World Premiere HD या तीन चॅनलवर 16 एप्रिलपासून रात्री 10.30 वाजता गेम ऑफ थ्रोन्स पाहता येणार आहे. मात्र स्टार वर्ल्डवर दाखवले जाणारे एपिसोड्स हे एडिडेड आणि सेन्सॉर असतील त्यामुळे बोल्ड सीन्स, रक्तपात यासारखे सीन्स टेलिव्हिजनवर दिसणार्‍या सीरीजमध्ये नसतील.

खर्च

Star World दरमहा 9.44 रूपये, Star World HD दरमहा 10.62 रूपये आणि Star World Premiere HD दरमहा 10.62 रूपये असा उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त टॅक्स आणि इतर खर्च आहे.

अगदीच विनाखर्च पहायचे झाल्यास अनेक प्रेक्षक टोरंटसारख्या वेबसाईट्सवरून गेम ऑफ थ्रोन्स सीझनचे एपिसोड्स डाऊनलोड करतात मात्र तो एक प्रकारचा गुन्हा आहे. यामुळे कलाकार आणि निर्मात्यांच्या मेहनतीवरदेखील पाणी फिरते.