Good Newwz Movie (Photo Credits-Twitter)

'गुड न्यूज' (Good Newwz) हा अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजित दोसांज, किआरा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षक तसेच चित्रपट विश्लेषकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 17.56 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या चित्रपटाला मुंबई तसेच दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विषेश म्हणजे बॉक्स ऑफिसवर सलमान खानचा 'दबंग 3' चित्रपट 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. परंतु, असे असतानादेखील पहिल्याच दिवशी 'गुड न्यूज' चित्रपटाने 'दबंग 3' चित्रपटाला मागे सारत उत्तम कमाई केली आहे. (हेही वाचा - अभिनेत्री माधुरी दीक्षितने 3.25 कोटी रुपयांना विकला आपला हरियाणातील बंगला)

'गुड न्यूज' चित्रपटाची कमाई अशीच राहिल्यास हा चित्रपट 150 ते 200 कोटी रुपयांची कमाई करेल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विट हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. अक्षय कुमारच्या 'गुड न्यूज' चित्रपटाने 17.56 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे, असं तरण आदर्शने सांगितलं आहे.

'गुड न्यूज' या चित्रपटाच्या माध्यमातून वेगळ्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांना गुड न्यूज चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये दोन गर्भवती महिला आहेत. या चित्रपटात 2 कुटुंब दाखवण्यात आली आहेत. या दोन्ही कुटुंबांचे आडनाव 'बत्रा' असे आहे. ही दोन कुटुंब इन-विट्रो फर्टिलाइजेशन (IVF) तंत्रज्ञानाच्या मदतीने बाळ मिळवण्यासाठी एका खासगी रुग्णालयात जातात. तेथे त्यांच्या शुक्राणुंची अदलाबदल होते. हा सर्व गोंधळ, धम्माल या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.