Birthday Special: Genelia वहिनींनी Riteish Deshmukh साठी वाढदिवसानिमित्त लिहिला 'हा' गोड मेसेज; पाहा त्यांचा फॅमिली फोटो
Riteish Deshmukh, Genelia (Photo Credits: Instagram)

Riteish Deshmukh Birthday Special: दीपिका-रणवीर किंवा अनुष्का-विराट या पॉप्युलर बॉलीवूड कपल्सच्या तुलनेत रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ही जोडी कदाचित इतकी चर्चेत दिसत नसेल पण या जोडप्याने गेल्या काही वर्षांत कपल गोल्सची व्याख्याच बदलली आहे. सोशल मीडियावरील पीडीए असो व एकत्र वर्क आउट करणं असो, रितेश आणि जेनेलिया या दोघांनाही या गोष्टी अगदी परफेक्ट जमतात.

रितेश देशमुख आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या या खास दिवशी जेनेलिया ने सोशल मीडियावर त्याच्यासाठी खूपच गोड असा मेसेज लिहिला आहे. हा मेसेज लिहिताना तिने त्यांचा फॅमिली फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ती लिहिते, "तू नेहमीच माझा राहशील. आता तुला मी जे सांगणार आहे तेच आपण 100 वर्षांचे झालो की ही सांगेन - तू तू आजही माझा आहेस आणि उद्याही. वाढदिवसाच्या शुभेच्छा, लव्ह फोरेवर युअर्सPS- मी तुझयासाठी नेहमीच चांगल्या मूड मध्ये असते."

देशमुखांच्या या फॅमिली फोटो मध्ये, जेनेलिया आणि त्यांची मुलं, सर्वजण रितेशला किस करताना दिसत आहेत. दरम्यान, जेनेलिया आणि रितेश यांनी 2012 मध्ये ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही पद्धतीने लग्न केले होते.

जेनेलिया व रितेश देशमुख यांचा महराष्ट्र पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25 लाखाचे योगदान

जेनेलियाने 2017 मध्ये रितेशला सर्वात महागडी अशी टेस्ला गाडी गिफ्ट केली होती. यावर्षी मात्र ती काय स्पेशल गिफ्ट देणार आहे हे अद्याप तिने सिक्रेटच ठेवलं आहे.