Gehana Vasisth ने मुंबई पोलिसांवर लावले गंभीर आरोप, अटक न करण्यासाठी 15 लाख मागितल्याचा दावा
Gehana Vasisth (Photo Credit: Instagram)

अश्लील फिल्मच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) सध्या जामिनावर बाहेर आहे. आता तिने एका मुलाखतीत मुंबई पोलिसांवर मोठा आरोप लगावला आहे. मुंबई पोलिसांवर आरोप लावत गहना हिने दावा केला आहे की, तिला अटक करु नये म्हणून 15 लाख रुपयांची रक्कम मागितली गेली होती. खरंतर अश्लील फिल्म प्रकरणी अटक झालेला उद्योगपती राज कुंद्रा यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. अभिनेत्री गहना हिचे नाव राज कुंद्राच्या प्रकरणात सामील आहे. दुसऱ्या बाजूला गहना कडून राज कुंद्राला पाठिंबा दिला जात असल्याचे दिसून येत आहे.(Porn Racket: पॉर्न रॅकेट चालवल्याप्रकरणी अभिनेत्री नंदिता दत्ताला अटक, जबदरस्तीने अश्लील व्हिडिओत काम करायला लावण्याचा आरोप)

इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत गहना हिने आरोप लावला आहे की, मुंबई पोलिसांनी तिला अटक करु नये म्हणून तिच्याकडून 15 लाख रुपये मागितले होते. गहनाने असे ही म्हटले की, जर तिने पैसे दिल्यास तिला अटक केले जाणार नाही. पण मी त्यांना पैसे दिले नाही असे गहनाने स्पष्ट केले आहे. कारण त्याने काही चुकीचे केलेले नाही. मात्र ज्या व्हिडिओ मध्ये मी काम केले आहे ते बोल्ड आणि अश्लील नव्हते. त्यानंतर पोलिसांना याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी सुद्धा दिली होती.('माध्यमांनी पोलिसांच्या माहितीच्या आधारे बातम्या दिल्या, तर ती बदनामी कशी ठरेल?' हायकोर्टाने Shilpa Shetty ला फटकारले)

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात गहना हिला विशेष पोलिसांनी अश्लील फिल्म प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर आता जमिनावर बाहेर असून मीडियासमोर आपले मत व्यक्त करत आहे. मात्र आता मुंबई पोलिसांवर 15 लाख रुपये मागितल्याचा आरोप लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सेक्सी व्हिडिओ आणि हिंदी सेक्सी व्हिडिओ तयार करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. असे मानले जात आहे की. येत्या काळात पोलिसांकडून आणखी काही खुलासे केले जाऊ शकतात.