Porn Racket: पॉर्न रॅकेट चालवल्याप्रकरणी अभिनेत्री नंदिता दत्ताला अटक, जबदरस्तीने अश्लील व्हिडिओत काम करायला लावण्याचा आरोप
Pornhub Top 20 Countries by Traffic on Pornhub (Photo Credits: Unsplash)

पोर्नोग्राफी प्रकरणात (Pronography Case) अटक झालेल्या शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी संपूर्ण देशात चांगलीच चर्चा रंगली असताना कोलकाता येथूनही पोर्नोग्राफी संबंधित एक प्रकरण समोर आले आहे. दरम्यान, कोलकाता पोलिसांनी अभिनेत्री नंदिता दत्ताला (Nandita Dutta) पोर्न फिल्म (Porn Films) बनवण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, नंदिता दत्ता आणि तिचा साथीदार मैनाक घोषला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वेब सीरिजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवत मुलींचे सेक्सी व्हिडिओ (Sexy Video) शूट करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

नंदिता दत्ताने स्वतः देखील अश्लील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती नॅन्सी भाभी म्हणून लोकप्रिय होती. पोलिसांच्या आरोपानुसार, नंदिता बऱ्याच काळापासून अश्लील चित्रपटांच्या व्यवसायात गुंतलेली होती. या व्यवसायात ती नवीन मॉडेल आणायची आणि जाहिराती करून तरुणींना आकर्षित करायची. ती सुरुवातीला मुलींचे सामान्य आणि अर्धनग्न फोटो काढायची. त्यानंतर पैशांचे आमिष दाखवत पॉर्न फिल्म शूट करायची. हे देखील वाचा- Bikini Top घालून बाहेर फिरण्यासाठी निघाली तारा सुतारिया, शर्ट घालण्यास विसरली काय? अशा शब्दात केले ट्रोल

याचदरम्यान, कोलकात्यातील वेश्याव्यवसायाच्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यानंतर ही कारवाई झाली आहे. नंदिता दत्ता सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे आणि तिची चांगली फॅन फॉलोइंग आहे.