Gautami Patil: लावणी क्वीन गौतमी पाटील ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी टीव्हीत तर कधी सोशल मीडियावर तीच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. गौतमी चित्रपटात पर्दापण करणार असल्याची घोषणा केली होती. घुंगरू या आगामी चित्रपटात मुख्य भुमिकेत गौतमी काम करणार आहे. लावणी क्वीन गौतमी आता अभिनय क्षेत्रात सुध्दा झळकणार हे ऐकताच चाहत्यांना ही भरपुर आंनदा झाला आहे. सोशल मीडियावर गौतमीचा चाहता वर्ग भरपुर आहे.
आता या घुंगरू चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. अशी माहिती वृत्तांना मिळाली आहे. महाराष्ट्राची सद्या राजकीय परिस्थिती पाहता आगामी चित्रपट घुंगरूची प्रदर्शित होणारी तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. चाहते या चित्रपचटाची वाट उत्सुकतेने पाहत आहे. लावणीच्या क्षेत्रात गौतमी नाव कमवलं आणि आता ती मोठ्या पडद्यावर ही झळकणार आहे.
चित्रपटाचं ट्रेलर काही दिवसांपुर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या चित्रपटाचं निर्मीती आणि दिग्दर्शन बाबा गायकवाड यांनी केले आहे. या चित्रपटाच रिलीज होणारी तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे गौतमीच्या चाहत्यांना थोडा वाटचं पाहावी लागणार आहे. राज्याची राजकीय परिस्थिती पाहता येत्या आठवड्यात चित्रपटाची रिलीज तारिख सांगण्यात येईल असे बाबा गायकवाड यांनी सांगितले आहे.
गौतमी ही तिच्या अश्लिल कृत्यामुळे नेहमीच चर्चेत राहीली आहे. चाहते ह्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटातील तिच्या भुमिकेकडे सर्वेचे लक्ष लागले आहेत. या चित्रपटाचं शुटींग परदेशात ही झाले आहे. राज्यभरात गौतमीला कोणत्याही कार्यक्रमात नाचण्यासाठी बोलवलं जाते. तीच्या अश्लिल कृत्यामुळे सोशल मीडियावर तुफाना व्हायरल होत असते. सबसे कातील गौतमी पाटील असं ओळख सोशल मीडियावरून मिळाली.