Gautami Patil Dances Video: 'घुंगरु' घेऊन गौतमी पाटील पडद्यावर, पण कोणासोबत? घ्या जाणून
गौतमी पाटील हिच्या डान्सचे व्हिडिओ (Gautami Patil Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. तिच्या नाचामुळे ती वादात असली तरी आता ती सिनेमाच्या पडद्यावर (Gautami Patil Movie) झळकणार असल्याचे समजते. सांगितले जात आहे की, गौतमी पाटील हिचा 'घुंगरु' (Gautami Patil Ghungroo) नावाच्या सीनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकते आहे.
गौतमी पाटील तिचा डान्स (Gautami Patil Dances Video) आणि डान्समध्ये तिने केलेले हावभाव हे सगळेच कसे चर्चेत. गौतमी पाटील हिला राज्यभरातून कार्यक्रमासाठी असलेली मागणी आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हा सुद्धा अनेकांच्या दृष्टीने चर्चेचा विषय. आजघडीला गौतमी एक असे व्यक्तीमत्व आहे. ज्याच्या नावाने गर्दी जमते. तिच्या डान्सचे व्हिडिओ (Gautami Patil Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. तिच्या नाचामुळे ती वादात असली तरी आता ती सिनेमाच्या पडद्यावर (Gautami Patil Movie) झळकणार असल्याचे समजते. सांगितले जात आहे की, गौतमी पाटील हिचा 'घुंगरु' (Gautami Patil Ghungroo) नावाच्या सीनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकते आहे. लावणीरुपात स्टेजवर पडलेले तिचे पाऊल प्रसिद्धीच्या रुपात तर यशस्वी ठरले आहे. आता अभिनयात लोक तिला कसे स्वीकारतात याबाबत लवकरच कळणार आहे. दरम्यान, चर्चा आहे ती गौतमीसोबत अभिनेता कोण असणार?
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात बाबा गायकवाड यांचे नाव छापले आहे. बाबा गायकवाड हेच या चित्रपटाची निर्मिती आणि लेखन करणार आहेत. तसेच, गौतमी पाटील सोबत तेच स्क्रीनही शेअर करणार असल्याचे समजते. चित्रपटातील दृश्यं सोलापूर (Solapur), माढा (Madha), हंपी (Hampi) आणि विदेशातही शूट झाल्याचे बोलले जात आहे. एका टीव्ही मालिकेतून बाबा गायकडवा घराघरात पोहोचले होते. आता ते चित्रपटातही काम करणार असल्याची चर्चा आहे. (हेही वाचा, Gautami Patil Viral Video: गौतमी पाटील चिडली, तरुणाला कानाखाली मारली; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
गौतमी पाटील सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेले व्यक्तीमत्व आहे. सर्वाधिक चर्चा असते ती तिच्या डन्सची. लावणीच्या नावाखाली ती करत असलेल्या डान्समध्ये ती ज्या प्रकारचे हावभाव करते त्यावर अनेकांचे आक्षेप आहेत. लावणीसम्राज्ञी म्हणून महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे अशा सुरेखा पुणेकर, छाया खुटेगावकर, यांच्यासह अनेकांनी तिच्या लावणी नामक नृत्यावर आक्षेप घेतला आहे. तरीही खरं सांगायचं तर गौतमी पाटील (Gautami Patil) म्हणजे आजघडीला तरुणांच्या गळ्यातील ताईत. नृत्यात ती करत असलेले हावभाव पाहून अनेक तरुणांचा कलेजा खलास होतो. त्यामुळे महाराष्ट्रातून गौतमीच्या कार्यक्रमांना जोरदार मागणी असते. तसेच, तिचे कार्यक्रमांना मोठी गर्दीही होते. गौतमी पाटील हिचे लावणी आणि विविध कार्यक्रमांतील व्हिडिओही जोरदार व्हायरल होतात
(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2023 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

