Gautami Patil Hot Photos | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Gautami Patil Controversy: गौतमी पाटील (Gautami Patil) म्हणजे आजघडीला तरुणांच्या गळ्यातील ताईत. नृत्यात ती करत असलेले हावभाव पाहून अनेक तरुणांचा कलेजा खलास होतो. त्यामुळे महाराष्ट्रातून गौतमीच्या कार्यक्रमांना जोरदार मागणी असते. तसेच, तिचे कार्यक्रमांना मोठी गर्दीही होते. गौतमी पाटील हिचे लावणी आणि विविध कार्यक्रमांतील व्हिडिओही जोरदार व्हायरल (Gautami Patil Viral Video) होतात. तिचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. अर्थात गौतमी पाटील आणि चर्चा हे समिकरणच असले तरी ही चर्चा तिच्या नृत्यामुळे नव्हे. सध्या तिचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो एका तरुणाला फटकवतानाचा.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. मात्र, या व्हिडिओत लावणीच्या वेशात दिसणारी तरुणीही गौतमी पाटील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एका ठिकाणी जमाव जमला आहे. या जमावात गौतमी पाटील कथीतरित्या दिसत आहे. ती लावणीच्या वेशात दिसत आहे त्यावरुन असा अंदाज बांधता येतो की, हा जमाव लावणीच्या कार्यक्रमासाठी जमला असावा. त्याच वेळी ही घटना घडली असवी. (हेही वाचा, Gautami Patil च्या कार्यक्रमात पुन्हा राडा; बेफाम झालेले चाहते चढले स्टेजवर, दगडफेकीच्याही घटना (Watch Video))

सांगली जिल्ह्यातील बेडग गावत एका लावणी कार्यक्रमादरम्यान ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. लावणी कार्यक्रमादरम्यान नेहमीप्रमाणेच जमाव काहीसा अधिकच प्रेरीत झाला. त्यातच जमावातील एका तरुणाने गौतमी पाटील हिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर गौतमीचा पारा चांगलाच चढला. तिने थेट जमावात घुसत तरुणाला फटका मारल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. दरम्यान, गौतमीने कथीतरित्या ज्या तरुणाला मारले त्या तरुणाची खरोखरच चूक होती का, त्याने खरोखरच गौतमीची छेड काढली होती का, शिवाय ज्या तरुणाने हे कृत्य केले तो हाच तरुण होता का? असे सवालही उपस्थित केले जात आहेत.

गौतमी पाटील व्हिडिओ

गौतमी पाटील सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेले व्यक्तीमत्व आहे. सर्वाधिक चर्चा असते ती तिच्या डन्सची. लावणीच्या नावाखाली ती करत असलेल्या डान्समध्ये ती ज्या प्रकारचे हावभाव करते त्यावर अनेकांचे आक्षेप आहेत. लावणीसम्राज्ञी म्हणून महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे अशा सुरेखा पुणेकर, छाया खुटेगावकर, यांच्यासह अनेकांनी तिच्या लावणी नामक नृत्यावर आक्षेप घेतला आहे.