दसऱ्याच्या मुहूर्तावर सलमानने केला दबंग ३ मधल्या 'रावणा'चा पहिला लुक शेयर
FIRST LOOK | (PIC COURTESY: TWITTER)

दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) आपल्या आगामी चित्रपटात व्हिलन साकारणाऱ्या सुदीपचा फर्स्ट लुक शेयर केला. विजया दशमीचं औचित्य साधून प्रदर्शित केलेल्या दबंग चित्रपटातल्या 'रावणाची'' पहिली झलक आज सगळ्यांना पाहायला मिळाली. दाक्षिणात्य सुपरस्टार सुदीप (Sudeep) दबंग 3 (Dabangg 3)  मध्ये 'बल्ली'ची भूमिका करणार आहे.

'व्हिलन जितका मोठा, तितकी त्याच्याशी लढताना धमाल येते ', असं कॅप्शनही त्याने ह्या फोटोसोबत लिहिलं आहे. दबंग ३ या चित्रपटातील 'चुलबुल पांडेचं' पोस्टर ह्या आधीच प्रदर्शित झालं होतं. सुदीपचा हा लुक काही वेळातच व्हायरल झाला. हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. दबंगच्या ह्या भागाचं दिग्दर्शन प्रभू देवाने केलं आहे. ह्या आधी प्रभू देवाने सलमानसोबत 'वॉन्टेड' (Wanted) हा चित्रपट केला होता.

सलमान खान ट्विट 

दबंगच्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन अभिनव कश्यप ह्याने केलं होतं, तर दुसऱ्या भागाचं अरबाज खान ह्याने केलं होतं. आधीच्या दोन चित्रपटांप्रमाणेच ह्या चित्रपटातही सोनाक्षी सिन्हा सलमानच्या पत्नीची, 'रज्जो'ची आणि अरबाज खान भावाची, 'मक्खी'ची भूमिका साकारत आहे. तर विनोद खन्ना ह्यांच्या निधनानंतर त्यांची भूमिका त्यांचेच बंधू प्रमोद खन्ना करत आहेत.