Film Producer Harish Shah Passes Away: बॉलीवुड चे ज्येष्ठ फिल्म निर्माते- दिग्दर्शक हरीश शाह यांचे निधन
हरीश शाह (Photo Credits: Twitter)

आज सकाळी बॉलीवुड (Bollywood) ला पुन्हा एकदा मोठा नवा धक्का बसला आहे. बॉलिवूड चे प्रसिद्ध ज्येष्ठ निर्माते- दिग्दर्शक हरीश शाह (Harish Shah) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मागील काही वर्षांपासून ते कॅन्सरशी (Cancer) झुंज देत होते, आज अखेरीस या लढतीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. हरीश शाह यांनी अनेक प्रसिद्ध सिनेमांची निर्मिती केली आहे. काला सोना (Kala Sona), मेरे जीवन साथी (Mere Jivan Sathi), धन दौलत (Dhan Daulat), जलजला (Jaljala), जाल- द ट्रैप (Jaal-The Trap), होटल (Hotel) , राम तेरे कितने नाम (Ram Tere Kitne Naam)  ही त्यातीलच काही नावे सांगता येतील. RIP Saroj Khan: नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्या निधनाने रेमो डिसूजा, फराह खान, अक्षय कुमार, जेनेलिया देशमुख यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली!

आज, मंगळवार 7  जुलै रोजी त्यांचे राहत्या घरी निधन झाले. बॉलीवुड सिनेमांसोबतच शाह यांनी शॉर्ट फिल्म 'वाय मी' ची सुद्धा निर्मिती केली होती, विशेष म्हणजे या फिल्म साठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा प्राप्तझाला होता. हरीश यांचे भाऊ विनोद शाह यांनी सांगितले की आज दुपारी त्यांच्यावर पवनहंस स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

मागील काही काळात बॉलिवूड ने अनेक मोठे कलाकार गमावले आहेत. सुरुवातीला इमरान खान, मग ऋषी कपूर त्यानंतर संगीतकार वाजिद खान, सुशांत सिंह राजपुत, सरोज खान यांच्या निधनाने अगोदरच कलाविश्वात निर्माण झालेल्या पोकळीत आता हरीश शाहयांच्या निधनाने आणखीन भर पडली आहे.