मराठी भावगीतातील अनेक एव्हरग्रीन हिट्स दिलेले गीतकार, कवी डॉ. मुरलीधर गोडे (Dr. Murlidhar Gode) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे, ठाणे यथील आपल्या राहत्या घरी त्यांनी वयाच्या 83 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. गोडे यांच्या मृत्यपूर्वीच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान (Organ Donations) केले आहेत. गोडे यांच्यापश्चात त्यांच्या पत्नी, मुले, नातवंडे एवढे मोठे कुटुंब आहे. गोडे यांनी कला क्षेत्रासोबतच राजकारण, समाजकार्य यातही उल्लेखनीय काम केले आहे. पुणे: ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास
डॉ. मुरलीधर गोडे यांनी आपल्या करिअरमध्ये 14 चित्रपटांसाठी गीतलेखन केलं. 'प्रीतीचं झुळझुळं पाणी', 'मी कशाला आरशात पाहू गं', 'अरे ले लो भाई चिवडा लो', 'हे गर्द निळे मेघ, बिलगून जशी वीज' ही त्यांची गाणी त्याकाळी प्रचंड गाजली होती. अगदी अलीकडेच त्यांनी ढोलताशा या सिनेमासाठी सुद्धा गाणी लिहिली होती. याशिवाय त्यांनी मालिकांची शीर्षकगीते सुद्धा लिहिली आहेत. गीतकार आणि कवी म्हणून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. ठाणे नगररत्न पुरस्कार, जागतिक वृद्ध दिन पुरस्कार, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी त्यांची 55 वर्षांची मैत्री होती. जोशी यांनी सुद्धा गोडे यांच्या निधनावर खेद व्यक्त केला आहे.