
अश्लील चित्रपटांच्या प्रकरणात क्राइम ब्रँचने (Crime Branch) शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) याला अटक केली आहे. कोर्टाने राज कुंद्रा यांना 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशा परिस्थितीत तपास अधिकारी या प्रकरणात जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. या संदर्भात शिल्पा शेट्टी यांना मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलवले गेलं होत. यामध्ये चौकशी (Inquiry) दरम्यान काही वेळा शिल्पा शेट्टी रडल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी कुंद्राची कोठडी वाढविण्यात आली आहे. तेव्हा अधिकारीही जुहू येथील त्यांच्या घरी पोहोचले. शिल्पा शेट्टी यांची जेथे भेट घेतली. तेथे अधिकाऱ्यांनी त्यांचे निवेदनही नोंदवले. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांकडे बरीच महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळाली आहेत.
जेव्हा अधिकारी शिल्पा शेट्टी यांची चौकशी करत होते. तेव्हा ती खूप घाबरली होती आणि आता ती अस्वस्थ दिसत होती. २ तास चाललेल्या चौकशीत शिल्पाने सांगितले की अशा कोणत्याही प्रकरणात आपल्या पतीचा सहभाग आहे. याची तिला माहिती नाही. तिला जे काही माहिती मिळाली आहे, ती सर्व वृत्तपत्रांमधून मिळाली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते पुन्हा शिल्पाची चौकशी करू शकतात. शिल्पाने शुक्रवारी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हॉट अॅपच्या सामुग्रीविषयी तिला काहीच माहिती नाही. नवऱ्याच्या व्यवसायात तिने हस्तक्षेप केला नाही. शिल्पाने सांगितले की ती कुठेही अॅप व्यवसायाशी संबंधित नव्हती. कुंद्रा कंपनीच्या वियान इंडस्ट्रीजच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच शिल्पाने पॉर्न फिल्म प्रकरणात पती राज कुद्राचा बचाव केला आहे. तिने तिचा नवरा एरोकिट चित्रपट बनवितो मात्र ते अश्लील नसतात. असे पोलिसांना सांगितले आहे.
राज कुंद्राच्या अश्लील रॅकेट समोर आल्यानंतर शिल्पा बर्याच वादात अडकली आहे. त्याचा परिणामही त्यांच्या प्रतिमेवर झाला आहे. राज यांच्या अटकेनंतर शिल्पाच्या हातातून अनेक प्रकल्पही गेले आहेत. शिल्पाला रिअॅलिटी डान्स शो सुपर डान्सर 4 मधूनही वगळण्यात आले आहे. या शोमध्ये शिल्पाला जज म्हणून पाहिले होते. आता निर्मात्यांनी यासाठी शिल्पा ऐवजी करिश्मा कपूरकडे संपर्क साधला. त्याचबरोबर 23 जुलै रोजी रिलीज झालेल्या शिल्पा शेट्टी यांच्या हंगामा 2 या चित्रपटावर राज कुंद्राच्या केसचा प्रभावही दिसून येतो आहे.