Veteran Theater Artisist Ebrahim Alkazi Passes Away; ज्येष्ठ नाट्यकर्मी इब्राहीम अलकाजी यांचे निधन
Ebrahim Alkazi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय नाट्यसृष्टीत प्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक आणि नाट्यकर्मी अशी ओळख असलेले इब्राहिम अलकाजी (Ebrahim Alkazi) यांचे आज निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. एका खासग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अलकाजी इब्राहिम यांनी भारतीय नाट्यसृष्टीत उल्लखनीय योगदान दिले. तसेच, त्यांनी बॉलिवूडमधील अनेक महान कलाकारांसोबतही काम केले आणि त्यांना अभिनयाचे धडेही दिले. यात नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah), ओम पुरी (Om Puri), अमरीष पुरी यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

इब्राहिम अलकाजी यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. इब्राहिम अल्काजी यांनी भारतीय नाट्यसृष्टीत क्रांतीकारी काम केले. त्यांचे काम हीच त्यांची ओळख ठरली. 1940 ते 1950 या काळात मुंबईतील सर्वात चर्चित आणि लोकप्रिय नाट्यकर्मिंमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमांकावर होते. 37 व्या वर्षी इब्राहिम अल्काजी हे दिल्लीला गेले. तेथे ते 15 वर्षांपर्यंत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा संस्थे संचालक पदावर कार्यरत राहिले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेत प्रदीर्घ काळ सेवा देणारे ते एकमेव व्यक्ती आहेत. (हेही वाचा, Bhaskarrao Avhad Dies: ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे निधन)

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेत अलकाजी यांनी अनेक विद्यार्थी आणि कलाकारांना अभियनय आणि रंगमंचावरील बारकावे शिकवले. इब्राहिम अलकाजी यांनी गिरीश कर्नाड यांच्या तुघलक, धर्मीवर भारती यांच्या अंधारयुग यांसारख्या लोकप्रिय नाटकांची निर्मिती केली. तसेच, बॉलिवुडमधील दिग्गज कलाकार नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांच्यासह अनेक कलाकारांना अभिनयातील बारकावे शिकवले. अलकाजी यांच्या मुलाने माहिती देताना सांगितले की, हृदयविकाराच झटका आल्यामुळे मंगळवारी दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. त्यांना दोन दिवसांपूर्वीच एस्कोर्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.