
महाराष्ट्रातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड (Bhaskarrao Avhad) यांचे पुण्यामध्ये निधन झाले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 77 वर्षीय भास्करराव हे दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या निधनाचं वृत्त समजात अनेकांनी दु:ख व्यक्त केले अअहे. एनसीपी खासदार सुप्रिया सुळे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
भास्कर आव्हाड हे अहमदनगर जिल्ह्यातील शिराळ चिंचोडी गावचे होते. ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे स्नेही समजले जात असे. पुणे शहरामध्ये एमआयटी शिक्षण संस्था उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. महाराष्ट्रात राजकीय वर्तुळामध्येही त्यांचा समावेश होता. अनेक शिकाऊ वकील, न्यायाधीशांना ते मार्गदर्शन करत होते.
पंकजा मुंडे ट्वीट
ॲड.भास्करराव आव्हाड सर यांचे आज पुणे येथे दुःखद निधन झाले. मुंडे साहेब आणि आव्हाड सर यांचा कौटुंबिक स्नेह तर होताच, शिवाय ते त्यांचे गुरू व नातेवाईकही होते.
मी त्यांना माझ्या बालपणापासून पहात आले आहे. एक शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ख्याती होती.
(१/२)
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 24, 2020
अॅड भास्करराव आव्हाड हे बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात 3 मुले, पत्नी आणि परिवार आहे. लॉकडाऊनच्या काळातही अॅद जाधव अनेकांना ऑनलाईन माध्यमातून सल्ला देत होते.
सध्या पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबई पेक्षाही अधिक अॅक्टिव्ह रूग्ण सध्या पुण्यात आहेत.