Arun Kakde (Photo Credits Facebook)

ज्येष्ठ रंगकर्मी, 94 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, 'आविष्कार' नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक, आधारस्तंभ अरुण काकडे (Arun Kakade) यांचे आज (9 ऑक्टोबर) मुंबईमध्ये निधन झाले. दीर्घ आजाराशी सामना करताना अरूण काकडे यांची प्राणज्योत आज दुपारी त्यांच्या राहत्या घरी मालवली. मराठी नाट्यसृष्टीमध्ये ' काकडे काका' ओळख असलेल्या अरूण काकडेंच्या निधनाची बातमी पसरताच चाहते आणि कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर, निपुण धर्माधिकारी ते नेते जयंत पाटील यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

मागील 67 वर्ष अरूण काकडे प्रायोगिक रंगभूमीवर वावरत होते. अरविंद देशपांडे, विजया मेहता, सुलभा देशपांडे यांनी 1971 साली 'आविष्कार' ही नाट्यसंस्था सुरू केली तेव्हापासून त्यांनी आविष्कारच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळली आहे.

सई ताम्हणकर ट्वीट

निपुण धर्माधिकारी

जयंत पाटील

भारतीय संगीत नाटक अकादमीसोबतच नाट्यक्षेत्रातील त्यांच्या कार्याचा,योगदानाचा गौरव महत्त्वाच्या पुरस्कारांनी झाला आहे.