केरळ पूरग्रस्तांसाठी 'अमर फोटो स्टुडिओ' टीमचा मदतीचा हात
सुनील बर्वे, देवेंद्र फडणवीस, अमेय वाघ ( photo credits: Twitter)

काही दिवसांपूर्वी केरळ भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. महापूरात केरळमधील अनेक गावांचं नुकसान झालं आहेत. केरळच्या पुर्नवसनासाठी देशा-परदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. केरळच्या मदतीला आता मराठी कलाकारही सरसावले आहेत.

अमर फोटो स्टुडिओची मदत

अमर फोटो स्टुडिओ हे सध्या तुफान वेगात सुरू असलेले एक मराठी नाटक आहे. सुबक आणि कलाकारखान खाना निर्मित नाटक तरूणवर्गामध्ये खास लोकप्रिय ठरलं आहे. या नाटकाने नुकतेच केरळच्यापूरग्रस्तांसाठी खास प्रयोग राखीव ठेवले होते. या प्रयोगातील जमा झालेला निधी नुकताच अभिनेता, निर्माता सुनील बर्वे आणि अमेय वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्त केला आहे. मराठी रंगभूमीवरील सध्याची ही '6' दर्जेदार नाटकं पाहिलीत का ?

 

केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ

पेटीएमपासून सरकारच्या रीलिज फंडापर्यंत अनेकांनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदत केंद्र सुरू केली आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यामध्ये पुढाकार घेतला आहे.

पैशांच्या मदतीसोबतच काही स्वयंसेवक स्वतः केरळमध्ये मदतीला सज्ज आहेत. जीएसबी सेवा मंडळ या किंग्ज सर्कलच्या गणेशोत्सव मंडळानेही केरळमधील काही गावं पुनर्वसनासाठी दत्तक घेतली आहेत.