मराठी रंगभूमीवरील सध्याची ही '6' दर्जेदार नाटकं पाहिलीत का ?

मराठी रंगभूमी आणि रसिकांचं खास नातं आहे. रंगभूमीवर सारा खेळ हा प्रत्यक्ष सुरू असतो. त्यामुळे चाहत्यांप्रमाणेच कलाकारांनाही रंगभूमीवर नाटकाचा प्रत्येक प्रयोग करणं हे आव्हान असतं. रंगभूमीचं सच्चा कलाकार घडवायचं काम करत असतं. म्हणूनच कलाकृती उत्तम असेल तर रसिकही भरभरून दाद देतात.

वि.वा शिरवाडकरांसारख्या प्रतिभासंपन्न नाटककारांच्या कलाकृतींपासून ते आज रंगभूमीवर नव्याने प्रयोग करू पाहणार्‍या निपुण धर्माधिकारीसारख्या उमद्या दिग्दर्शकांनी अनेक दर्जेदार नाटकं रंगभूमीवर आणली आहेत. मग यंदा विकेंडला तुम्ही यापैकी कोणतं नाटक पहायला जाताय ?

1. अनन्या

अनन्या ही मूळ कॉलेज स्तरावरील स्पर्धेत सादर केलेली एकांकिका आहे. रूईया महाविद्यालयाच्या या एकांकिकेत स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत होती. आता हे नाटक व्यावसायिक स्वरूपात रंगभूमीवर आलं आहे.

एका अपघातादरम्यान दोन्ही हात गमावलेल्या तरूणीच्या जिद्दीची ही कहाणी आहे. 'इच्छा तेथे मार्ग' या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव या नाटकामध्ये येतो.अभिनेत्री ऋतूजा बागवे या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहे.

2. अलबत्या गलबत्या

सुरूवातीला केवळ उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांसाठी रंगभूमीवर आलेलं हे नाटकं बघता बघता लोकप्रिय झालं. रंगभूमीवर आल्यापासून या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल होत आहे. हे बालनाट्य असलं तरीही आबालवृद्धांना खिळवून ठेवणारं आहे. या नाटकात मुख्य भूमिकेतील अभिनेता वैभव मांगले चिंची चेटकीणीच्या भूमिकेत आहे. या नाटकाने एकाच दिवशी सलग 5 प्रयोग करण्याचा विश्वविक्रमही रचला आहे.

3. हॅम्लेट

हॅम्लेट हे शेक्सपिअरचं लोकप्रिय नाटक आहे. या नाटकाचं मराठीत रूपांतर केलं आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केलं आहे. सुमीर राघवन, मुग्धा गोडबोले, मनवा नाईक, भूषण प्रधान, तुषार दळवी अशी तगडी स्टारकास्ट या नाटकात आहे.

4. संगीत देवभाबळी

वरपाहता विठ्ठल भक्तीवर वाटणारं हे नाटक स्त्रियांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकते. अवली आणि रुक्मिणी या दोन भूमिका संबंध नाटकभर रसिकांना खिळवून ठेवतात. या नाटकाची दखल यंदा 'फोर्ब्स' मासिकामध्येही घेण्यात आली आहे.

5. अमर फोटो स्टुडिओ

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित अमर फोटो स्टुडिओ हे तरूणाईचं आवडत्या नाटकापैकी एक आहे. फॅंटसी या प्रकारात मराठी रंगभूमीवर खास प्रयोग झालेले नाहीत. प्रत्यक्ष रंगमंचावर ही मज्जा अनुभवासाठी नक्की पहा अमर फोटो स्टुडिओ !

6. वन्स मोअर

भरत जाधवच्या चाहत्यांसाठी खूषखबर आहे. अनेक दिवसांनी भरत जाधव नव्या नाटकातून रंगभूमीवर आला आहे.