Maldive (Image Credit - Pixabay)

मालदीवच्या (Maldives) मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि भारताबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर भारतीय पर्यटकांचा संताप उसळला आहे. सोशल मीडियापासून ऑनलाइन बुकिंग (Online Booking) प्लॅटफॉर्मपर्यंत सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे. यानंतर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, श्रद्धा कपूर, रणवीर सिंग सारख्या कलाकारांनी मालदीववर टीका तिथे चित्रपटाचे शुटिंग करण्यास नकार दिला आहे. दरम्यान ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) चित्रपट निर्मात्यांना मालदीवमध्ये चित्रपटांचे शुटिंग करु नका अशी विनंती केली आहे. ( No Confidence Motion Against Maldives Govt: भारत विरोधी टिप्पणीमुळे मालदीव सरकारविरोधात नाराजी, विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाची मागणी)

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने अध्यक्ष सुरेश श्यामलाल यांनी सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. सुरेश म्हणाले,” काही दिवसांपूर्वी मालदीवच्या मंत्र्यानी भारताविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भारत विरुद्ध मालदीव ट्रेंड सुरु झाला. इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचा अध्यक्ष होण्याच्या नात्याने मी सर्व चित्रपट निर्मात्यांना विनंती करतो की त्यांनी मालदीवला बायकॉट करावं. तिथे कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग करु नये.

पाहा व्हिडिओ -

मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारताचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर व तसेच भारतीय नागरिकांबाबत अपमानास्पद टिप्पणी केली होती. या घटनेनंतर सगळ वाद सुरु झाला. हा वाद इतका वाढला की सोशल मीडियावर बायकॉट मालदीव ट्रेंडला सुरुवात झाली.