Karnan Movie Release Date (Photo Credit: Twitter)

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा (Dhanush) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कर्णन’ (Karnan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता याच चित्रपटाविषयी एक मोठी बातमी पुढे आली आहे. नुकताच धनुषने या चित्रपटाच्या रिलीज तारखेची घोषणा केली असून हा चित्रपट येत्या 9 एप्रिल 2021 थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. धनुषने ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाची फर्स्ट लूक शेअर केला आहे. फर्स्ट लूकमध्ये धनुष आक्रमक दिसत आहे. त्याच्या कपाळाच्या एका बाजूला रक्तस्त्राव होत आहे. त्यांच्या हातात हातकडी बांधलेली असताना मोठ्या संख्येने लोक त्यांच्या मागे उभे असल्याचे दिसून येत आहे.

दिग्दर्शक मारी सेल्वाराज यांनीही चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे सांगत त्यांनी लिहिले, "न्यायाचा आत्मा कधीच मरत नाही. या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि प्रदर्शित तारिख शेअर करून मला खूप आनंद होत आहे, असे ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Anita Hassanandani आई झाल्यानंतर आपल्या बाळाला हातात घेतल्याचा फोटो सोशल मिडियावर केला शेअर, See Pic

ट्विट-

'कर्णन' या चित्रपटात धनुष व्यतिरिक्त राजिशा विजयन, लक्ष्मी प्रिया चंद्रमौली, नटराजन सुब्रमण्यन, योगी बाबू, आलागमपेरुमल, लाल आणि गौरी जी किशन या मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाचे संगीत संतोष नारायणन यांनी दिले आहे. चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरमध्ये पूर्ण झाले होते. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर धनुषने मारी सेल्वराजसोबत एक चित्र शेअर केले आणि चित्रपटासाठी दिग्दर्शकाचे आभार मानले आहे.

याआधी धनुषने पोस्ट केले होते की 'कर्णन'चे शूटिंग पूर्ण झाले आहे. मारी सेल्वराज यांनी मला हे दिल्याबद्दल धन्यवाद. समर्थनाबद्दल थानू सरांचे आभार. माझ्या सर्व सह-कलाकार आणि तंत्रज्ञांचे मनापासून आभार. संतोष नारायणन यांनी या खास चित्रपटासाठी दिलेल्या संगीताबद्दल विशेष आभार.