Anita Hassanandani आई झाल्यानंतर आपल्या बाळाला हातात घेतल्याचा फोटो सोशल मिडियावर केला शेअर, See Pic
या फोटोमध्ये अनिता आणि रोहित हे दोघे बाजू-बाजूला बसले असून अनिताने आपल्या हातात आपल्या मुलाला घेतले आहे. अनिता आणि रोहित दोघेही या बाळाकडे पाहून हसत आहेत.
अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) हिने 9 फेब्रुवारी 2021 रोजी एका गोंडस मुलाला जन्म (Baby Boy) दिला. ही बातमी वा-यासारखी सगळीकडे पसरली. अनिता आणि तिचा पती रोहित रेड्डी (Rohit Reddy) माता-पिता झाल्याने त्यांचा आनंद तर गगनात मावेनासा होता. अनिताच्या पतीने रोहितनेच सोशल मिडियावरुन सर्व प्रथम सर्व चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर अनिताच्या चाहत्यांना तिच्या मुलाची पहिली झलक पाहण्याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे अनिताने ही उत्सुकता जास्त ताणून न ठेवता आपल्या बाळाला हातात घेऊन एक सुंदर फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोमध्ये एक ट्विस्ट आहे.
या फोटोमध्ये अनिता आणि रोहित हे दोघे बाजू-बाजूला बसले असून अनिताने आपल्या हातात आपल्या मुलाला घेतले आहे. अनिता आणि रोहित दोघेही या बाळाकडे पाहून हसत आहेत.हेदेखील वाचा- अनीता हसनंदानी आणि रोहित रेड्डी यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
View this post on Instagram
या फोटोमध्ये अनिताने बाळाच्या चेह-यावर एक स्माईली इमोजी लावले आहे. त्यामुळे बाळाचा चेहरा दिसत नाही. या पोस्टखाली 'आता आपण तिघे आहोत. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्याचसोबत हॅशटॅग वापरत ‘NewMommyDaddy’ असे म्हटले आहे. अनिताचा हा फोटो सध्या चर्चेत आहे.
या फोटोला आतापर्यंत 7 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहेत. अनिताच्या चाहत्यांसोबत तिचा मित्रपरिवार, स्टार्स मंडळी देखील तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे.
अनीता हिने टेलिव्हजनवर आपली एक वेगळीच ओखळ निर्माण केली आहे. शेवटी ती नागिन या कार्यक्रमातून झळकली होती. अनीता हिने नागिन 3 आणि नागिन 4 मध्ये मुख्य भुमिका साकारल्याचे दिसून आले होते. त्याचसोबत अनीता ही तिचा पती रोहित याच्यासोबत नच बलियेच्या 9 व्या सीझनमध्ये सु्द्धा झळकली होती.
(The above story first appeared on LatestLY on Feb 14, 2021 03:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

