Farokh Engineer Anushka Sharma | (IANS/Instagram)

अनुष्का शर्मा (Anushka Sharma), क्रिकेट आणि वाद ही काही आता नवीन गोष्ट राहिली नाहीये. विराट कोहलीशी नाव जोडल्या गेल्यापासून ते अगदी लग्न झाल्यावर सुद्धा बऱ्याच वेळी अनावश्यक कारणांसाठी तिचं नाव अनेक विवादांमध्ये गोवलं गेलेलं आहे. आता यात अजून एक भर पडली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांनी केलेल्या एका आरोपामुळे नवीन वाद निर्माण झाला होता. पण आता अनुष्का शर्माने एक मोठं ट्विट करत त्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

फारूख इंजिनियर यांनी निवड समितीवर अनेक आरोप करताना या वर्षी इंग्लंड मध्ये झालेल्या वर्ल्ड कप दरम्यान ते फक्त अनुष्का शर्माला चहाचा कप आणून द्यायचं काम करत होते असेही एक विधान केले होते. त्याला उत्तर देताना केलेल्या ट्विटमधून अनुष्का शर्माने प्रथमच आपली बाजू मांडली आहे. अनुष्का म्हणते.,''माझ्या नावावर खपणवण्यात येणाऱ्या अनेक खोट्या गोष्टींमधील ही नवी गोष्ट. सर्वात आधी म्हणजे मी या वर्ल्ड कपला फक्त एकच सामना पहायला आले होते. आणि त्यात सुद्धा मी खेळाडूंच्या फॅमिली साठी असणाऱ्या चमूत बसले होते. निवडकर्त्यांच्या नाही. पण जेव्हा सोय पाहिली जाते तेव्हा सत्याकडे नेह्मीच दुर्लक्ष केलं जातं.''

 

निवड समितीच्या मुद्द्यांबाबत बोलताना अनुष्का म्हणते,''जर तुम्हाला त्यांच्या पात्रतेविषयी काही शंका असतील आणि तुम्हाला त्यावर काही टिप्पणी करायची असेल तर तुम्ही जरूर करा पण तुमचं मत लोकांवर ठसवण्यासाठी आणि त्याला प्रदद्धि मिळावी यासाठी मला मध्ये घेऊ नका. हा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही.'' (हेही वाचा. Satte Pe Satta च्या रिमेक साठी Hrithik-Anushka च्या नावावर शिक्कामोर्तब; पहिल्यांदाच सोबत झळकणार रुपेरी पडद्यावर)

अनुष्का शर्मावर याआधीही बरेच आरोप करण्यात आले आहेत. ती बऱ्याचदा टूर्स वर कोहलीसोबत दिसते आणि सामन्यांना हजेरी सुद्धा लावते. जेव्हा कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे तेव्हा तेव्हा अनुष्काला दोष देण्यात आला आहे. या ट्विटमध्ये अनुष्काने तिच्यावरती बोर्डावर तिकिटांसाठी दबाव आणत असल्याचा आरोपाचाही खरपूस समाचार घेतला आहे. ती म्हणते,''मी याबाबत कधीच काही बोलले नाही. कारण मला तशी गरजच वाटली नव्हती. पण खरं तर माझ्या प्रवासापासून ते तिकिटांपर्यंतचा सर्व खर्च मी स्वतःच्या पैशातून करत असते. बोर्डाच्या नाही.''

अनुष्काच्या या प्रत्युत्तराचं सर्वांनी कौतुक केले आहे. सिनेमासृष्टीतूनही तिला पाठिंबा मिळत आहे.