मराठमोळी भाग्यश्री मोटे झळगणार टॉलिवूडमध्ये
अभिनेत्री भाग्यश्री मोटे | (Photo courtesy: Facebook)

मराठी मालिकांच्या माध्यमांतून टीव्हीचा छोटा पडदा व्यापल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) टॉलिवूडमध्ये (Tollywood) झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. 2019 या वर्षात भाग्यश्री तिच्या चाहत्यांना आनंदाचे आणि आश्चर्याचे अनेक धक्के देण्याची शक्यता आहे. लवकरच ती 'चिकती गदीलो चिताकोटुडू' (Chikati Gadilo Chithakotudu) या तेलुगू चित्रपटातून (South Film Industry) चाहत्यांच्या भेटीला येतआहे. हॉरर कॉमेडी असलेल्या 'चिकती गदीलो चिताकोटुडू'चा टीझरही सोशल मीडियात नुकताच लॉन्च प्रदर्शीत झाला आहे.

दरम्यान, 'चिकती गदीलो चिताकोटुडू' याचित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी, हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शीत होणार याबाबत मात्र गुप्तता बाळगली गेली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात कधी खुला होणार याबाबत उत्सुकता आहे. मित्रमंडळी फिरण्यासाठी एका ठिकाणी जातात. ते ज्या ठिकाणी वास्तव्यास थांबतात. त्या ठिकाणी भूत असते आणि मग त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, यावर आधारीत या चित्रपटाची कथा आहे. भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटाचा पोस्टर व टीझरही शेअर केले आहे. तसेच, माझ्या नवीन वर्षाची सुरूवात या बातमीने झाली. माझे तेलगूमध्ये पदार्पण असलेला चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू'चा टीझर प्रदर्शित झाला आहे, असा संदेश लिहायलाही ती विसरली नाही. (हेही वाचा, अमेय वाघ झळकणार हिंदी वेबसीरिजमध्ये; अर्शद वारसी सोबत करणार ‘असुरा’गिरी)

भाग्यश्रीने मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. सध्या महाराष्ट्रात चांगलाच चर्चेत असलेल्या 'पाटील' या मराठी चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दरम्यान, भाग्यश्रीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी अशी की, लवकरच ती म्हणे बॉलिवूडमध्येही झळकणार आहे.