Devendra Fadanvis यांच्या नावापायी चांदनी मोदी यांनी गमावले लाखो रुपये; बघा काय होतं त्यामागचं खरं कारण
Devendra Fadnavis | (PTI)

आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आयुष्यभराची कमाई करण्याची संधी म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) स्वप्नं सगळेच पाहतात. अशाच असंख्य स्वप्नाळू भारतीयांनी आपल्या आयुष्यातली स्वप्ने या शोच्या माध्यमातून पूर्ण केली आहेत. आयुष्यात एकदा तरी हॉट सीटवर बसावे असं प्रत्येकालाच वाटतं. तसंच प्रत्येक जण कोटीमोलाचं उद्दिष्ट घेऊन गेलेला असतो. पण चांदनी मोदी या अहमदाबाद मधल्या स्त्रीनं मात्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) नाव घेतलं आणि तिला लाखो रुपयांवर पाणी सोडावं लागलं.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की फडणवीस आणि केबीसीचा नक्की संबंध काय? त्याचं झालं असं की चांदनी मोदी या साडेबारा लाखांपर्यंत पोचल्या होत्या. 25 लाखांसाठी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण. आंणि त्यांच्या समोर पर्याय होते शरद पवार, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस. या प्रश्नापर्यंत त्यांच्या सर्व लाईफलाईन वापरून झाल्या होत्या. त्यांनी या प्रश्नावर बराच विचार केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हा पर्याय लॉक करायला सांगितला. परंतु या प्रश्नाचं अचूक उत्तर हे शरद पवार होतं. त्यामुळे कमावलेले साडेबारा लाखही त्यांना गमवावे लागले. आणि अखेरीस साडेतीन लाख रुपयांची रक्कम घेऊन त्या परत गेल्या. (हेही वाचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह घेतले केदारनाथ दर्शन)

चांदनी मोदी या अहमदाबादच्या रहिवासी आहेत. त्या त्यांच्या पती आणि संपूर्ण कुटुंबासोबत शोमध्ये आल्या होत्या. त्यांच्या सासरकडील मंडळी हे अमिताभ बच्चन यांचे खूप मोठे चाहते असल्या कारणाने त्यांच्यासाठी इथे येणं हेच 7 करोड जिंकण्यासारखं असल्याचं त्यांनी सांगितलं.