Bomb Hoax at Rajinikanth’s House: सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब आढळल्याची अफवा; 8वीच्या विद्यार्थ्याच्या चुकीच्या माहितीमुळे गोंधळ
रजनीकांत (Photo Credits: PTI)

Bomb Hoax at Rajinikanth’s House: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या पोएस गार्डन (Poes Garden) येथील राहत्या घरी बॉम्ब सापडल्याच्या वृत्ताने सर्वत्र एकच गोंधळ निर्माण झाला होता मात्र आता हे वृत्त खोटे असून ही एका आठवीत शिकणाऱ्या मुलाने पसरवलेली अफवा असल्याचे उघड झाले आहे. यानंतर रजनीकांत यांच्या फॅन्स ने सुटकेचा श्वास सोडलाय असे म्हणता येईल. प्राप्त माहितीनुसार, रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब असल्याचे सांगणारा एक कॉल आला होता. यानुसार तपास केला असता मात्र हा कॉल खोटा असल्याचे समजून आले. पोलिसांनी आणखीन सखोल तपास केला असता हा कॉल एका आठवीतील मुलाने केल्याचे समजत आहे. हा विद्यार्थी शिक्षणाने वैतागला असल्याने त्याने असा प्रकार केल्याची कबुली दिली आहे.

टाइम्स ऑफ इंडिया च्या रिपोर्ट अनुसार, कड्डलोर (नेल्लिकुप्पम) येथे राहणारा हा विद्यार्थी आहे. या मुलाने गुरुवारी सकाळी 10.30 वाजता कॉल केला होता. हा कॉल येताच पोलीस आणि बॉम्ब स्क्वाड चे अधिकारी रजनीकांत यांच्या घरी पोहचले मात्र याबाबत काहीही कल्पना नसलेल्या रजनीकांत यांच्या परिवाराने अधिकाऱ्यांना दारावरच्या रोखले. यानंतर सर्व चर्चा झाल्यावर अखेरीस ही केवळ अफवा होती हे स्पष्ट झाले. संतापजनक! सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर बनवले भोजपुरी गीत; ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केला राग- ‘लाज विकली आहे की काय?’

दरम्यान, या मुलाबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याची वैद्यकीय व मानसिक तपासणी केली. त्याने कोणत्याही वाईट हेतूने हे केले नव्हते तसेच त्याचे वय पाहता पोलिसांनी हे प्रकरण बंद करून त्याला सोडून दिले.