आदित्य पंचोली (Aditya Pancholi) यांंची पत्नी आणि सूरज पंंचोली (Sooraj Pancholi) ची आई प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जरीना वहाब (Zarina Wahab) यांंना अलिकडेच कोरोनाची लागण (Coronavirus) झाली होती, गेल्या आठवड्यात त्यांंना लीलावती हॉस्पिटल (Lilavati Hospital) मध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांंना पाच दिवस ऑक्सिजन सपोर्टवर (Oxygen Support) ठेवण्यात आले होते.कोरोनाची लागण झाल्यावर सुरुवातीला त्यांंची प्रकृती स्थिर होती मात्र हळुहळु त्यांंच्यातील लक्षण गंभीर होत गेले, त्यांंना श्वसनात देखील त्रास व्हायला लागला परिणामी त्यांंच्या परिवाराने अगदी गुप्तरित्या त्यांंना हॉस्पिटल मध्ये दाखल केले.आता सध्या हॉस्पिटलच्या सुत्रांंनुसार जरीना यांंची प्रकृती सुधारली असुन त्या घरी परतल्याचे समजतेय.
जरीना यांंच्यावर उपचार केलेल्या डॉ. जलील पारकर यांनी जरीना यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी केली होते, जरीना यांंना सांधेदुखी, अंगदुखी, थकवा आणि ताप असे त्रास होते जेव्हा त्या हॉस्पिटल मध्ये आल्या तेव्हा तर त्यांंची ऑक्सिजन पातळी अगदी कमी होती.
दरम्यान, जरीना यांंनी किंंवा त्यांंचे पती आदित्य व मुलगा सूरज यांंनी याप्रकरणी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही, सध्या जरीना यांंनी स्वतःला घरात आयसोलेट करुन घेतल्याचे समजतेय मात्र त्यांंच्या कोरोना चाचणीचे नवे अहवाल निगेटिव्ह आलेत की नाही याबद्दल तरी अद्याप माहिती मिळालेली नाही.
बॉलिवूड मध्ये आजवर गायिका कनिका कपूर पासुन ते महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अर्जुन कपूर, मलाइका अरोड़ा आणि अन्यही अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकले होते.