अभिनेत्री झरीन खानच्या कारला धडकून एकाचा मृत्यू
झरीन खान (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री झरीन खानच्या (Zareen Khan) कारला धडकून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या अपघातात झरीन खानही जखमी झाली असल्याचे समजतेय. नितेश गोरल असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो 31 वर्षांचा होता. या प्रकरणी बाईक चालवणाऱ्याची चूक असल्याचे बोलले जात आहे.

गोव्यातील (Goa) अंजुना भागात कार युटर्न घेत असताना नितेशची बाईक कारवर आदळली. बाईकस्वाराने हेलमेट घातलेलं नसल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याचदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांना झरीन खानचा ड्रायव्हर अब्बास अली याला अटक केली आहे. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी झरीने खानने आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याने एक्स मॅनेजरविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती.

'वीर' सिनेमातून झरीनने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. या सिनेमात सलमान खानसोबत तिने काम केले होते. त्यानंतर 'हेट स्टोरी 3,' 'हाऊसफुल 2,' '1921' आणि 'अक्सर 2' यांसारख्या सिनेमात झरीन झळकली होती.