अँग्री रँटमॅन म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय YouTuber अभ्रदीप साहाचे वयाच्या 27 व्या वर्षी दुःखद निधन झाले. गेल्या महिन्यात मोठी शस्त्रक्रिया झाल्यापासून ते रुग्णालयात होते आणि त्याच्यावर उपचार देखील सुरु होते. दुर्दैवाने 16 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती बिघडली आणि . त्याच्या निधनाचे नेमके कारण अधिकृतपणे समोर आले नसून शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे बहुधा अनेक अवयव निकामी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by ABHRADEEP SAHA (@angryrantman)

एंग्री रँटमॅन क्रीडा, विशेषत: फुटबॉलवरील सामग्रीसाठी प्रसिद्ध होता आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स होते. 19 फेब्रुवारी 1996 रोजी जन्मलेला, तो कोलकाता येथील रहिवासी होता आणि त्याचे YouTube वर 481k पेक्षा जास्त सदस्य आणि Instagram वर 119k फॉलोअर्स जमा केले होते.

पााहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by KIDDAAN (@kiddaan)

त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांना खूप दुःख झाले आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोक व्यक्त होत आहे. त्याच्या चाहत्यांनी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर त्याच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला. त्याच्या अकस्मिक निधनाने अनेकांना धक्काच बसला.