बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आता दुसऱ्यांदा xXx: Return of Xander Cage 4 या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. हॉलिवुड कलाकार विन डीजल (Vin Diesel) ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दीपिकासोबतचा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. जेंडर केज या चित्रपटाचा हा चौथा भाग असणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये दीपिकाने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आता या सिनेमाच्या चौथ्या भागातदेखील दीपिका महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.
दीपिकाने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सुपटहिट चित्रपट केले आहेत. पुढील महिन्यात दीपिकाचा 'छपाक' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिकाने अॅसिड हल्ला झालेल्या मुलीची कथा मांडली आहे. दीपिकाने 'xxx : द रिर्टन ऑफ झँडर केज' या हॉलिवूड सिनेमामध्ये काम केलं आहे. दीपिकाचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट होता. आता याच चित्रपटाच्या चौथ्या भागात ती झळकणार आहे. (हेही वाचा - Deepika Padukone आणि Ranveer Singh यांनी घेतलं सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन)
View this post on Instagram
Heading into a xXx meeting this weekend... Who would you like to see added to the xXx League?
xXx: Return of Xander Cage 4 चित्रपटातील हॉलिवूड अभिनेता विन डीजलने याबाबत माहिती दिली आहे. विन डीजलने ही दीपिकासोबतचा फोटो शेअर करताना दीपिकालाही टॅक केलं आहे. त्यामुळे दीपिकाला दुसऱ्यांदा हॉलिवूड चित्रपटात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.