WWE स्टार John Cena याने शेअर केले Arshad Warsi याचे फोटो; सोशल मीडियावर युजर्सकडून भन्नाट प्रतिक्रिया
Arshad Warsi, John Cena | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

डब्ल्यूडब्ल्यूई WWE रेस्लर आणि हॉलीवुड स्टार जॉन सीना (John Cena) याने मुन्नाभाई के सर्किट, बॉलिवुड अभिनेता अरशद वारसी (Arshad Warsi) याचा एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. जॉन सीना हा नेहमीच भारताशी संबंधित खास करुन बॉलिवूड बाबतचे अनेक फोटो, व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत आला आहे. अलिकडेच त्याने बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाबाबत त्याची एक प्रतिमा इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. अरशद वारसी याचा फोटो शेअर करत त्याने म्हटले आहे की, तो सध्या त्याच्या फिटनेसवर चांगलेच लक्ष देत आहे.

अरशद वारसी (Arshad Warsi) यानेही जॉन सीना याच्या सोशल मीडियाचा एक स्क्रिन शॉट शेअर केला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा स्क्रिन शॉट शेअर करत त्याने जॉन सीना याने माझा फोटो शेअर केल्याचे म्हटले आहे. पोस्टमध्ये अरशद वारसी म्हणतो की, 'एक दीर्घ प्रवास निश्चित करायचा आहे. पण आपण पुढच्या प्रोजेक्टसाठी आपण शेफमध्ये येणे सुरु केले आहे. दरम्यान, जॉन सीना याने मात्र कोणत्याही पोस्टशिवाय अरशदचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, या फोटोवर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. (हेही वाचा, WWE स्टार John Cena अडकला विवाहबंधनात; जाणून घ्या पत्नी Shay Shariatzadeh बद्दल काही खास गोष्टी)

इस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena)

अरशद वारसी याचा फोटो पाहून एका युजर्सने त्याला सर्किट सीना म्हटले आहे. तर दुसऱ्या फॅनने म्हटले आहे की, जॉन सीना (John Cena) इंडियन आहे. आणखी एका फॅनने त्याला (जॉनला) भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे. अरशद वारसी याने मात्र, जॉनने माझा फोटो शेअर केल्याबद्दल आपल्याला आनंद झाल्याचे म्हटले आहे.