
शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या 'चक दे! इंडिया' (Chak De India) या सिनेमाने जबरदस्त कमाई करत रेकॉर्ड बनवला होता. या सिनेमा इतकंच त्याचं शीर्षक गीत सुद्धा हिट झालं होतं, या गाण्याचा एक खास किस्सा संगीतकार सलीम-सुलेमान (Salim Sulaiman) यांनी सांगितला आहे. IANS ला संगीतकारांच्या जोडगोळीने सांगितल्याप्रमाणे "जेव्हा आम्ही चित्रपटावर काम करू लागलो तेव्हा आम्ही एक देशभक्तीपर शीर्षक गाणे बनवण्याचे ठरवले. चित्रपटाची थीम आणि भावना प्रतिबिंबित करणारे असे काहीतरी करायचं एवढं स्पष्ट होतं मात्र त्याला निर्माता आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांनी नकार दिला. देशभक्ती पर गाणं ठीके पण ते स्लो ठेवल्यास पकाऊ होईल असे चोप्रा यांचे मत होते, त्यामुळे त्यांनी काहीतरी दमदार करा असे फर्मान सोडले आणि त्यानुसार आम्ही जबरदस्ती दमदार असलेलं गाणं बनवायला घेतलं अर्थात त्यात काहीच आत्मा नव्हता परिणामी चांगला निकाल न आल्याने एक दोन नव्हे तर सात वेळा गाणं नाकारलं गेलं". जागतिक संगीत दिन साजरी करण्याची प्रथा कशी आणि कुठून झाली?
पुढे सलीम मर्चंट याने सांगितले की, सात वेळा गाणं नाकारलं जातं या विचाराने मग आम्ही चित्रपात सोडायचा का अश्याही चर्चा करत होतो मात्र तेव्हा आदित्य ने विचारले की," सलीम, '' जुम्मा चुम्मा '' सूर सुने है क्या (तुम्ही 'जुम्मा चुम्मा' हे गाणे ऐकले आहे का?) 'मी हो म्हणालो आणि मग तो' चक दे चक दे इंडिया, चक दे चक दे इंडिया इंडिया 'गायला लागला ... तो म्हणाला की त्याला 'जुम्मा चुम्मा' नको आहे, परंतु तितकीच उर्जा असलेलं काहीतरी हवंय आणि मग त्यातूनच हे तेच गाणे तयार केले गेले.
चक दे Title Song
शिमित अमीन दिग्दर्शित, "चक दे! इंडिया" 10 ऑगस्ट 2007 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुपरस्टार शाहरुखने भारतीय महिला हॉकी संघाचा प्रशिक्षक म्हणून काम केले होते. सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत टीम इंडिया ने विश्वचषक जिंकला यावर आधारित हा सिनेमा अत्यंत हिट झाला होता व सोबतच सलीम सुलेमान यांनी संगीत दिलेलं आणि सुखविंदर सिंह यांच्या आवाजातील चक्र दे इंदूर टायटल ट्रक सुद्धा तुफान गाजला होता.