'लवयात्री'मध्ये अर्पिता खान झळकणार ?
लव्हयात्री सिनेमात अर्पिता (Photo Credit : Twitter & Instagram)

सध्या सलमान खान निर्मित करत असलेल्या 'लवरात्रि' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. सिनेमाची गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या सिनेमातून सलमान खान बहिण अर्पिता खान शर्मा हिचा नवरा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लॉन्च करत आहे. पण आता अर्पिता देखील या सिनेमात काम करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

पण या सर्व अफवा असून अर्पिता 'लवयात्री' सिनेमात दिसणार नाहीये. तिची कोणतीही भूमिका यात नाही. फक्त अर्पिता टॅटूच्या माध्यामतून सिनेमात दिसेल. कारण आयुषच्या डाव्या हातावर अर्पिता नावाचा टॅटू गोंदवला आहे आणि सिनेमातही तो लपवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही.

त्याचबरोबर लवरात्रि या नावावरुनही सलमानवर चहुबाजूने टीका होत होती. हिंदू धर्मातील सण नवरात्री याशी मिळतेजुळते नाव असल्याने टिकास्त्र उसळले होते. त्यानंतर सलमानने सिनेमाचे नाव बदलून लवयात्री असे केले आणि ट्विटवर त्याने ते जाहीर केले. ही स्पेलिंग मिस्टेक नाही, असेही त्याने ट्वीटमध्ये नमूद केले. तर आता सिनेमाचे नाव आहे 'लवयात्री- द जर्नी ऑफ लव्ह.'

अभिराज मीनावाला दिग्दर्शित हा सिनेमा 5 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.