सुष्मिता सेन सख्या भावाच्या लग्नातच आपल्या कुटूंबासोबत का झोपली; पहा लग्नसोहळ्यातील धमालमस्ती
Rajiv Sen Wedding Photo (Photo Credits: Instagram)

ग्लॅमरस अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिचा भाऊ राजीव सेनच्या (Rajeev Sen) लग्नाचे फोटो सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहेत. 16 जूनला गोव्यामध्ये राजीव आणि त्याची गर्लफ्रेंड चारू असोपा (Charu Asopa) लग्नबंधनात अडकले. गोव्यात झालेल्या या डेस्टिनेशन वेडिंग ला जवळच्या लोकांना बोलावण्यात आले होते. लग्नाचे विधी आणि लग्नसोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओ सुष्मिताने सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केले.

सुष्मिताने भावाच्या संगीत सोहळ्यात तिचा प्रियकर रोहमन शॉलसोबत खास रोमँटिक अंदाजात ‘नच दे वे सारे’ (Nach de ve sare) या गाण्यावर डान्स केला. तसेत तिच्या दोन्ही मुलींनी आणि चारूच्या कुटुंबियांनीही मनसोक्त डान्स केला. राजीव आणि चारूचं लग्न बंगाली आणि राजस्थानी या दोन्ही पद्धतीने गोव्यात पार पडलं.

इतकच नव्हे तर आपल्या कुटूंबियांसोबत फोटोशूट करत असताना तिने चक्क सर्वांना झोपायला सांगितले. या फोटोशूटचा व्हिडिओ ही तिने शेअर केला आहे, ज्यात ती आपल्या कुटूंबाला सांगत आहे की, तुम्ही सर्वांनी झोपायची अॅक्टिंग करा आणि असे दाखवा तुम्ही खूप थकले आहेत. या व्हिडिओत तिचे आई-बाबा, दादा-वहिनीही खूप धमालमस्ती करताना दिसत आहेत.

तसेच या सोहळ्यात नवविवाहित जोडप्याने पद्मावत मधील 'एक दिल है' या रोमँटिक गाण्यावर नृत्य केले.

सुष्मिताच्या घरी गृहप्रवेश करतानाचा चारूचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर झाला आहे. या हॉट कपलने मुंबईत रिसेप्शन पार्टी देण्याचं ठरवलं आहे. पण ही पार्टी कधी आणि कुठे असणार याचा खुलासा अजून झालेला नाही.