अभिनेत्री सुष्मिता सेन (Photo Credits-Instagram)

सुष्मिता सेन ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात चर्चेचा विषय बनली आहे. तसेच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तिच्या दैनंदिन आणि वैयक्तिक जीवनाबद्दल उघडपणे दिसून येत आहे. तर नुकताच सुष्मिता हिने सोशल मीडियात बाथटब मधील एक हॉट फोटो पोस्ट केल्याने तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये सुष्मिता सेन हिने काळ्या रंगातील कपड्यामधील हॉट बाथटब मधील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला ”The length & the breadth of it!!!” Beautiful shots @rohmanshawl I love them & the man behind the lens असे कॅप्शन दिले आहे. त्याचसोबत या कॅप्शमध्ये तिचा बॉयफ्रेंड रोहमन याच्या नावाचा सुद्धा उल्लेख तिने केला आहे. या फोटोवर रोहमनने ''MY MUSE so gorgeous uff'' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सुष्मिताचे चाहते या फोटोमुळे घायाळ झाले असून तिच्या लूकबद्दल तिला विविध प्रतिक्रिया देत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून रोहमन आणि सुष्मिता एकमेकांना डेट करत आहेत. तसेच तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये सुद्धा रोहमन बऱ्याच वेळा दिसून आला आहे. मात्र यापूर्वी सुद्धा सुष्मिता हिने अनेक स्टार्सला डेट केले असून तिचे नाव त्यांच्यासोबत जोडण्यात आले होते. दरम्यान सुष्मिता ही आपल्या हटके अंदाजातील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते.