Sushant Singh Rajput's Girlfriend Rhea Chakrobarty (Photo Credits: Instagram)

RIP Sushant Singh Rajput: बॉलिवूडचा हरहुन्नरी कलाकार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने रविवार 14 जून रोजी आपले जीवन संपवले. वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरी त्यांना गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे म्हंटले जातेय मात्र यावर अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. सुशांतच्या नातेवाईकांच्या मते तो काही दिवसांपासून एका बंगाली मुलीच्या प्रकरणावरून चिंतेत होता असे समोर आले होते. आता ही बंगाली मुलगी म्हणजे दुसरी कोणी नसून त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakroborty) आहे. या सगळ्या प्रकरणानंतर सोशल मीडियावर रिया चक्रवर्ती हे नाव चर्चेत आहे. कोण आहे ही रिया जाणून घ्या. अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या अकाली निधनाच्या धक्क्याने वहिनी सुधा देवी यांचा मृत्यू

काही महिन्यापासून सुशांत आणि रिया एकमेकांना डेट करत होते,लॉक डाऊन दरम्यान सुरुवातीला ते काही दिवस एकत्रच राहत होते मात्र नंतर त्यांच्यात वाद झाल्याने रिया सुशांतच्या घरून निघून गेली होती व तिने नंतर बोलणेही बंद केले होते असे मीडिया रिपोर्ट्स आहेत. याच पार्श्वभूमीवर काल  सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर गर्लफ्रेंड रिया चक्रवती ची पोलिसांकडून चौकशी केली जाणार

रिया चक्रवर्ती Photo 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on

Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडकरांवर भडकली कंगना रनौत; 'ही आत्महत्या नव्हती, तर ठरवून केलेला खून होता' (Watch Video).

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on

रिया चक्रवर्ती हि एक अभिनेत्री आणि मॉडेल असून 2013 मध्ये तिने बॉलिवूड मध्य डेब्यू केला होता. तिने काही साऊथ मुव्हीज मध्ये सुद्धा काम केले आहे. बॉलिवूड मध्ये येण्याआधी तिने व्हिडीओ जॉकी म्हणून काही वर्ष काम केले होते. मेरे डॅड की मारुती, सोनाली केबल, जलेबी या सिनेमात तिला पाहायला मिळाले होते. येत्या काळात रिया आणि सुशांत सुद्धा एका सिनेमात एकत्र काम करणार होते अशा चर्चा आहेत.

रिया चक्रवर्ती Photo

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on

काही महिन्यांपूर्वी सुशांतच्या वाढदिवसाला रिया ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून त्या दोघांचेही फोटो शेअर केले होते. या पोस्ट नंतर त्यांच्या रिलेशनशीप च्या चर्चांवर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते.

रिया चक्रवर्ती Photo 

दरम्यान, सुशांतच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी काल रिया जुहू येथील कूपर रुग्णालयात गेली होती तसेच विलेपार्ले येथे सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना सुद्धा रिया उपस्थित होती.