Sushant Singh Rajput Demise: सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर गर्लफ्रेंड रिया चक्रवती कुपर रुग्णालयात दाखल, पोलिसांकडून चौकशी केली जाणार
Rhea Chakraborty (Photo Credits-ANI)

सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास लावून घेतल्याची बातमी सर्वांसाठीच धक्कादायक आहे. यामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून त्याच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. सुशांत सिंह राजपूत डिप्रेशन मध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सुशांत या समस्येबाबत त्याच्या घरातून एक फाइल सुद्धा पोलिसांच्या हाती लागली आहे. असे बोलले जात आहे की, सुशांत रिया चक्रवती हिला डेट करत होता. मात्र या दोघांनी कधीच उघडपणे आपल्या नात्याबाबत काही सांगितले नाही. पण या दोघांचे एकमेकांसोबतचे फोटो इंन्स्टाग्रामवर झळकल्याचे दिसून आले आहे. तर सुशांतच्या निधनानंतर आता गलफ्रेंड रिया चक्रवती कुपर रुग्णालयात दाखल झाली आहे.

तर न्यूज18 नेटवर्क यांच्यानुसार, सुशांतच्या निधनाप्रकरणी रिया चक्रवती हिचा जबाब पोलिसांकडून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ती सुशांत सोबत क्वारंटाइन असल्याचे ही समोर आले. पण सुशांतच्या निधनाच्या एक दिवस आधी रिया आपल्या घरी परतली होती. त्यामुळे सुशांत याने अशा पद्धतीचे टोकाचे पाऊल का उचलले आणि त्या मागे नेमके काय कारण होते याबाबत अभिनेत्रीकडून उत्तरे शोधत आहेत.(RIP Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येविषयी निर्माते मुकेश भट यांनी केले 'हे' धक्कादायक विधान)

तर दुसऱ्या बाजूला सायबर गुन्हे शाखा आणि सेलेब्स यांच्याकडून सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्याचे जे फोटो व्हायरल झाले आहेत ते शेअर करु नका असे आवाहन करत आहेत. तसेच काही प्रसार माध्यम वाहिन्यांनी केलेल्या असंवेदनशील कव्हरेजमुळे सोशल मीडियावरही खळबळ उडाली आहे.