बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुतन (Nutan) यांची नात आणि मोहनीश बहल (Mohnish Bahl) यांची कन्या प्रनूतन बहल (Pranutan Bahl) ही तिचा आगामी चित्रपट हेल्मेटमुळे (Helmet) अधिक चर्चेत आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. या चित्रपटात कंडोम (Condom) संबंधी अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे. नुकतीच प्रनूतनने नवभारत टाईम्सला मुलाखात दिली आहे, ज्यात तिने या चित्रपट संदर्भात मोकळेपणाने आपले मत मांडले आहे. एखादी मुलगी मेडिकलच्या दुकानात गेली आणि तिने कंडोम खरेदी केल्यास तिच्या आजूबाजुचे कान आणि डोळे उभे होतात. मुलींच्या कंडोम खरेदी करण्यात चुकीचे काय आहे? असा सवाल तिने त्यावेळी विचारला आहे.
दरम्यान, प्रनूतन म्हणाली आहे की, हे पूर्णपणे सत्य आहे की सेक्स हा आपल्या समाजात निषिद्ध मानला जातो आणि म्हणूनच लोक कंडोमबद्दल बोलण्यास संकोच करतात. आम्ही चित्रपटात सांगत आहोत की कंडोम खरेदी करण्यात काहीच गैर नाही. कंडोमचा वापर करून अनेक आजार, लोकसंख्या, नको असलेली गर्भधारणा रोखता येते, हेच आम्ही आमच्या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त मुलेच का? मुलीही कंडोम विकत घेत असतील तर, त्यात काहीच गैर नाही, असे प्रनूतनने म्हटले आहे. हे देखील वाचा- Tejashri Pradhan New Look: अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा नवीन लुक पहिलात का ? (See Pics )
इंस्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
प्रनूतनने 2019 मध्ये नोटबूक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, तिचा हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. परंतु, तिने हार मानली नाही. आता तिचा 'हेल्मेट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेल्मेट चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा चित्रपट कधी पदर्शित होतो? याची चाहत्यांमध्ये उस्तुकता लागली आहे.