एकेकाळी बॉलीवूडची ‘आयटम गर्ल’ म्हणून मिरवणारी राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या सोशल मिडीयावर खूपच सक्रीय आहे. आपले फोटो, व्हिडिओ, इतरांवर केलेल्या खरपूस टीका या गोष्टींच्या जोरावर राखी चर्चेचा विषय बनत असते. राखी सावंतचे लग्न हा काही महिन्यांपूर्वी फार मोठा चर्चेचा विषय बनला होता. अनेक माध्यमांनी याबाबत वृत्त दिले होते. राखीनेही अनेक व्हिडिओ, फोटो शेअर करत आपले लग्न झाले असल्याचे भासवले होते. इतकेच नाही तर आपल्या पतीचे नाव रितेश असून तो लंडनचा आहे, असेही सांगितले होते. मात्र आता हे लग्न फेक असल्याचे समोर आले आहे.
राखीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती माध्यमांवर आरोप करताना दिसत आहे. ती म्हणते. ‘आत्महत्या हे मार्ग नाही, मलाही अनेकांनी हिणवले होते, कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हिम्मतीने मी उभी राहिले, इंडस्ट्रीमध्ये मोठ मोठ्या कलाकारांसोबत काम केले. मिडियाने नेहमीच माझ्याबद्दल वाईट लिहिले, मला नावे ठेवली. मला नेहमीच डिप्रेशनमध्ये जायला भाग पाडले, मात्र मी त्यांची कोणतीही गोष्ट ऐकली नाही, त्यांचा सामना केला. (हेही वाचा: ‘मराठी इंडस्ट्रीमध्येही चालते घराणेशाही-कंपूशाही, इथेही केले जाते तुमचे मानसिक खच्चीकरण’; दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर यांची खरपूस टीका (Watch Video))
पहा व्हिडिओ -
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये पुढे बोलताना ती म्हणते, ‘या मिडीयावाल्यांनी मला Chu**** बनवले नाही तर, मीच त्यांना Chu**** बनवले. एकदा एका शुटींगसाठी मी नववधूचा पोशाख केला होता, त्यावेळी मिडियामध्ये बातम्या आल्या की राखी सावंतचे लग्न झाले. त्यानंतर मी देखील ही गोष्ट उचलून धरली व सांगितले की माझे खरच लग्न झाले आहे. अशा प्रकारे मी मिडियाची चेष्टा केली. त्यामुळे माध्यमांनो तुम्ही मला डिप्रेशनमध्ये टाकायचा प्रयत्न करू नका. मी तुम्हाला सर्वांना पुरून उरेन.’
तर अशाप्रकारे रागात का होईना मात्र राखीने हे मान्य केले आहे की, तिचे लग्न झाले नाही व आधी ज्या बातम्या पसरल्या होत्या त्या फेक होत्या.