बॉलिवूड संगीतकार वाजिद खान यांच्या आईलाही कोरोना विषाणूची लागण

बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान (Wajid Khan) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. यातच वाजिद खान यांची आई रजिया खान ( Razina Khan यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कळत आहे. यामुळे सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. वाजिद खान यांच्या आईला मुंबई येथील चेंबूर परिसरातील सुराना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सजिद खान यांच्या आईची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे. साजिद यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची देखरेख करण्यासाठी रजिया खान तेथेच थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे.

बॉलिवूडला अनेक प्रसिद्ध गाणी देणाऱ्या साजिद-वाजिद ही संगीत दिग्दर्शक जोडी तुटली आहे. प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाजिद आजारी होते. किडनीच्या समस्येमुळे त्यांचे निधन झाल्याचे समजत आहे. चेंबूरमधील सुराना रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. वाजित खान यांना सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटासाठी त्यांना 2011 मध्ये फिल्मफेअर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. वाजिद यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांना संगीत दिले असून ‘मुझसे शादी करोगी’,‘दबंग' आणि ‘टायगर जिंदा है’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा त्यात समावेश आहे. हे देखील वाचा- अभिनेत्री मोहिना कुमारीसह, पती, सासू-सासरे अशा घरातील 7 जणांना कोरोना विषाणूची लागण

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. यामुळे संपूर्ण देशातून यांच्या कामगिरीचे कौतूक केले जात आहे.