विवेक ओबेरॉय आणि नरेंद्र मोदी (फोटो सौजन्य-PTI and Facebook)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या नंतर सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आयुष्यावर ही चित्रपटाची लवकरच निर्मिती करण्यात येणार आहे. हे खरं असून या चित्रपटासंबंधित घोषणा ही सोशल मीडियावर करण्यात आली आहे. चित्रपटाचे नाव पीएम नरेंद्र मोदी असे असणार आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय  (Vivek Oberoi) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या मुख्य भुमिकेतून विवेक दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार (Omung Kumar) करत आहेत. यापूर्वी 'मेरी कॉम' आणि 'सरबजीत' हे चित्रपट ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केले होते.

पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाचे निर्मिती एस सिंह करणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक 7 जानेवारीला प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर चित्रपटाचे चित्रकरण जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होणार आहे. तसेच ट्रेड तज्ञ तरण आदर्श यांनी ट्विटच्या माध्यमातून या चित्रपटाबद्दल सांगितले आहे.

अभिनेता विवेक ओबोरॉय याने नरेंद्र मोदी यांची भुमिका साकारण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी विवेक खुप मेहनत घेत आहे. तसेच नरेंद्र मोदींचा लूक आणि पेहराव याच्याकडे फारसे लक्ष दिले जात आहे. दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे चित्रपटाचे चित्रिकरण होणार आहे. या चित्रपटातील अन्य कलाकारांबद्दल गुप्तता ठेवण्यात आली आहे.