Vivek Anand Oberoi ला विना हेल्मेट दुचाकीवर पडले महागात, अद्दल घडविल्याबद्दल अभिनेत्याने मुंबई पोलिसांचे मानले आभार, See Tweet
Vivek Anand Oberoi (Photo Credits: Twitter)

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपल्या पत्नीला दुचाकीवरुन लाँग ड्राईव्हला घेऊन जाणारा अभिनेता विवेक आनंद ओबेरॉय (Vivek Anand Oberoi) चांगलाच अडचणीत सापडला. मुंबईच्या रस्त्यावर आपल्या पत्नीला घेऊन तो लाँग ड्राईव्हला निघाला खरा मात्र विना हेल्मेट.. त्याने वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्याला चांगलीच अद्दल घडवली. आपली चूक लक्षात येताच विवेक ओबेरॉयने ट्विटच्या माध्यमातून माफी मागत मुंबई पोलिसांनी त्याला धडा शिकवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच कृपया दुचाकीवरुन प्रवासादरम्यान हेल्मेट वापरा असे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले.

इतकच नव्हे तर फक्त वाहतुकीचेच नियम नव्हे, तर कोविड काळात सावधगिरीचा इशारा देत मास्क वापर आणि इतर प्रतिबंधात्मक नियमांबाबतही त्यानं चाहत्यांना सजग केलं आहे.हेदेखील वाचा- हेल्मेट आणि मास्क न घालता बाईक चालवल्याने बॉलिवूड अभिनेता Vivek Oberoi वर मुंबई पोलिसांची कारवाई

पाहा विवेक ओबेरॉयचे ट्विट

'प्यार हमे किस मोड प ले आया! निकले थे नयी बाईक पर हम और हमारी जान, बिना हेल्मेट के कट गया चलान! हेल्मेट शिवाय रायडिंग? मुंबई पोलिसांनी अद्दल शिकविल्याबद्दल त्यांचे आभार. काळजी घ्या, हेल्मेट वापरा, मास्क वापरा' अशा आशयाचे ट्विट विवेक ओबेरॉयने केले आहे.

नेमकं काय घडलं?

विवेक ओबेरॉयने व्हॅलेंटाईन्स डे ला आपल्या पत्नीसोबतचा दुचाकीवरील एक व्हिडीओ त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये तो नव्या दुचाकीच्या आनंदात हेल्मेटचा वापर करण्यास मात्र विसरला होता. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडियोत विवेक एका पेट्रोल पंपावर आला आणि त्याने त्याच्या अनेक चाहत्यांसोबत सेल्फी देखील काढत असल्याचंही दिसून येत आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. समाजसेवक बिनु वर्गीस यांनी ही बाब ट्विटरच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट मोटरसायकल चालवल्याबद्दल 500 रुपयांचा ई-चलनद्वारे दंड आकारला.